अमरिंदरसिंग
अमरिंदरसिंग  sakal
देश

राहुल, प्रियांकांकडे अनुभवच नाही : अमरिंदरसिंग

सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी आज पुन्हा काँग्रेस हायकमांडवर निशाणा साधला. पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याकडे पुरेसा अनुभव नाही असे सांगतानाच त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरोधात तगडा उमेदवार देऊ असे जाहीर केले. पक्षाचे सल्लागारच काँग्रेस नेतृत्वाची दिशाभूल करत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

पक्षांतर्गत वादामुळे अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अमरिंदरसिंग म्हणाले की, आम्ही पूर्ण ताकदीनिशी सिद्धू यांच्याविरोधात लढायला तयार आहोत. या घातक माणसापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचा त्याग करायला तयार आहे. आपण तीन आठवड्यांपूर्वीच राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती पण सोनिया गांधी यांनीच आपल्याला पदावर कायम राहण्याचे निर्देश दिले होते. सोनिया गांधी यांनी सांगितले असते तर मी आधीच राजीनामा दिला असता. मी स्वत ः एक माजी सैनिक आहे त्यामुळे युद्ध कसे लढायचे हे मला चांगलेच ठावूक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT