farmer protest sakal
देश

लखीमपूर: मंत्र्याचं निलंबन करा! शेतकऱ्यांचा आज देशव्यापी रेलरोको

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आज रेल रोको आंदोलनाची हाक दिली आहे. लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचं निलंबन व्हावं तसेच त्यांना अटक व्हावी यासाठी आंदोलन सुरु आहे. याआधीच या 18 ऑक्टोबर रोजी देशभरात रेल रोकोची हाक देण्यात आली होती. रेल्वेच्या संपत्तीला कसल्याही प्रकारचं नुकसान न पोहोचवता रेल्वे रोको आंदोलन शांततेने केलं जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. याबाबतची ग्वाही संयुक्त किसान मोर्चाकडून देण्यात आली आहे. या दरम्यान रस्ता रोको केला जाणार नाही, फक्त रेलरोको केला जाईल.

सहा तासांसाठी सेवा राहतील बंद

संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर राजेवाल यांनी म्हटलंय की, आधीच घोषित केल्याप्रमाणे किसान मोर्चा आणि त्याचे सहकारी घटक 18 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवतील. त्यांचा हा कार्यक्रम रेल्वे संपत्तीला बाधा न पोहोचवता शांतपणे होईल. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असं देखील त्यांनी म्हटलंय.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे हिंसाचार होऊन ९ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश असून चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच एका पत्रकाराचा समावेश आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलासह १५ जणांविरोधात तिकोनिया पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात आहे. या प्रकरणी गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

SCROLL FOR NEXT