Rajasthan Crime News esakal
देश

हुंड्यानं घेतला बळी : 3 सख्ख्या बहिणींसह 2 चिमुरड्यांनी केली आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

'आम्हाला मरायचं नाहीय, पण आमचे सासरचे लोक आम्हाला त्रास देताहेत.'

जयपूर : राजस्थानमधून (Rajasthan) एक धक्कादायक घटना समोर आलीय. एकाच कुटुंबातील 3 बहिणींनी त्यांच्या 2 मुलांसह आत्महत्या केलीय. कालू मीना, ममता आणि कमलेश अशी या महिलांची नावं आहेत. या तिघांचं वय 25, 23 आणि 20 वर्षे आहे. त्याच वेळी, एक मूल 4 वर्षांचं होतं आणि दुसरं फक्त 27 दिवसांचं होतं. मृत्युमुखी पडलेल्या तीनपैकी दोन महिला गर्भवती असल्याचंही सांगण्यात येतंय. या घटनेनंतर तिन्ही बहिणींचा सासरच्या घरात हुंड्यासाठी वारंवार छळ आणि मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय, त्यामुळं तिघांनीही आत्महत्या केलीय, असं त्यांचं म्हणणं आहे.

मृत महिलांचे चुलत भाऊ हेमराज मीना यांनी सांगितलं की, माझ्या बहिणींचा हुंड्यासाठी सतत छळ केला जात होता, त्या 25 मे रोजी बेपत्ता झाल्या होत्या. आम्ही त्यांना शोधण्यासाठी घरोघरी फिरलो. त्यानंतर आम्ही स्थानिक पोलीस (Rajasthan Police) ठाण्यात फोन केला आणि एफआयआर दाखल केला. तसंच राष्ट्रीय महिला आयोगाकडंही (National Commission for Women) तक्रार केली, पण आम्हाला मदत मिळाली नाहीय. बहिणींनी सुसाईड नोट लिहिली नसली, तरी त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वात धाकटी बहीण कमलेशनं व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर केले होते, त्यात तिनं म्हटलं होतं, 'आम्ही आता जात आहोत, तुम्हा सुखी रहा. माझ्या सासरचे आमच्या मृत्यूचं कारण आहेत. त्यामुळं रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, असं तिनं नमूद केलंय.

ती पुढं म्हणते, 'आपण एकत्र मरण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या जन्मात आपण एकत्र जन्म घेऊ. आम्हाला मरायचं नाहीय, पण आमचे सासरचे लोक आम्हाला त्रास देताहेत. आमच्या मृत्यूमध्ये माझ्या आई-वडिलांचा दोष नाहीय.' दरम्यान, महिला बेपत्ता झाल्यानंतर चार दिवसांनी पोलिसांनी शनिवारी सकाळी डुडू गावातील विहिरीतून तिन्ही पीडित महिला आणि दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर पीडितांचे पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध क्रूरतेसह इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या हत्येप्रकरणी पोलीस तिन्ही महिलांचे पती, सासू आणि इतर कुटुंबीयांची चौकशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT