Rajnath Singh 
देश

चीनला जशासतसं उत्तर देणार? राजनाथ सिंहांनी बोलावली लष्कर प्रमुखांची तातडीची बैठक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- पूर्व लडाखमधील गालवान खोऱ्यात सोमवारी रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष झाला आहे. यात एका भारतीय अधिकाऱ्यासह दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत, तिन्ही सैन्य दल प्रमुख आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. भारत आणि चीनमधील या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी चर्चेसाठी आपले वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पाठवले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर गोळीबार झाला आहे. त्यामुळे या घटनेला महत्व प्राप्त झाले असून दोन्ही देशांतील संबंध चिघळण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत चीनचेही नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, चीनचे किती सैन्य मारले गेले किंवा जखमी झाले याबाबत माहिती मिळू शकली नाही. भारतीय सैन्य सीमा ओलांडून चीनच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी आमच्या सैनिकांनी गोळीबार केला. मात्र, आम्ही केव्हाही शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवायला तयार आहोत, असं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे.
-------------
लॉकडाऊनच्या काळात तुम्हीही काढू शकता पैसै; कसे ते घ्या जाणून
--------------
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा दस का दम; दहाव्या दिवशीही वाढले दर
--------------
अभिमानास्पद! 'Black live Matter'आंदोलनाचे नेतृत्व एका भारतीय-अमेरिकन महिलेच्या हाती
---------------
1962 पासून भारत आणि चीनमध्ये गालवान खोऱ्यावरुन वाद आहे. गालवान खोरे पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमेवरील एक क्षेत्र आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताने या भागात मोठ्या प्रमाणात विकासकार्य हाती घेतले आहे. याठिकाणी रस्ते आणि लडाऊ विमानांना उतरण्यासाठी  धावपट्टी तयार केली आहे. भारताच्या निर्माणकार्याने चीन संतापला आहे. 6 मे रोजी चिनी सैनिकांनी या भागात घुसखोरी केली होती. तसेच दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारतीय जवान जखमी झाले होते. तेव्हापासून या भागात भारत-चीन सैन्य समोरासमोर आले होते. गेल्या दिड महिन्यापासून असलेल्या तणावाची परिणती सोमवारी झालेली चकमक असल्याचं बोललं जात आहे.

दोनच दिवसांपूर्वी भारतीय लष्कर प्रमुख म नरवणे यांनी भारत-चीन सीमेवरील स्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलं होतं. तसेच चीनसोबत लष्कर आणि राजकीय पातळीवर चर्चा सुरु असून दोन्ही देश यातून तोडगा काढतील असं म्हटलं होतं. मात्र, चीनने केलेल्या या आगळकीने भारत आणि चीनमधील संबंध पेटणार आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांमध्ये 5 बैठका पार पडल्या आहेत. मात्र, परिस्थिती जैसे थे असून सोमवारच्या हिंसक घटनेने ती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT