Raj Thackeray greets Manmohan Singh on his birthday
Raj Thackeray greets Manmohan Singh on his birthday 
देश

माझ्या सकट, भारतीयांना तुमच्या ज्ञानाची उणीव भासते- राज ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांना आपल्या खास शैलीत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्ष चिमटा काढला आहे.

राज ठाकरे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की, देशाला अर्थिक उदारीकरणाच्या वाटेवर यशस्वीपणे नेणारे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ह्यांचा आज वाढदिवस आहे. 1991 नंतरच्या आर्थिक उदारीकरणाची फळं ज्यांनी चाखली, त्याच वर्गाने डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करण्यात काही काळ पुढाकार घेतला होता.

परंतु, देशाची अर्थव्यवस्था, आर्थिक निरक्षरांनी गर्तेत ढकलली असताना, माझ्या सकट, तमाम भारतीयांना तुमच्या ज्ञानाची उणीव नक्कीच भासत आहे. अर्थमंत्री असताना असेल किंवा पंतप्रधान असताना असेल, तुम्ही देश ज्या पद्धतीने आर्थिक संकटातून बाहेर काढले त्याचं महत्व, आजच्या आर्थिक अराजकतेच्या काळात जाणवत आहे. राजकारणात टीका होतच असते, ती कधी काळी आम्ही पण केली, पण चांगल्या गोष्टींचं कौतुक करण्याचं औदार्य आमच्याकडे नक्कीच आहे. डॉ. मनमोहन सिंग ह्यांच्या भाषणातलाच एक संदर्भ घेऊन म्हणेन "इतिहास तुमच्या कार्याचं आणि योगदानाचं नक्कीच योग्य मूल्यांकन करेल.' अशा आशयाची फेसबुक पोस्ट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ही पोस्ट करताना त्यांनी पोस्टच्या सुरवातीला #HappyBirthdayDrSingh हा हॅशटॅग वापरला आहे. एक प्रकारे राज यांनी मनमोहन सिंग यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कामाचे कौतुक करताना आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ते निरक्षर असल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT