Ram not Voting Public will Vote says Omar Abdullah
Ram not Voting Public will Vote says Omar Abdullah  
देश

मतदान राम नाही, तर जनता करणार : अब्दुल्ला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अयोध्या येथे राम मंदिर उभारण्यासाठी भाजपच्या एका खासदाराने खासगी विधेयक आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानंतर यावर आता जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ''मतदान करायला राम किंवा अल्ला येणार नाहीत. जनताच सरकार निवडून देणार आहे''. 

अब्दुल्ला यांनी सांगितले, की 2019 मध्ये प्रभू रामाच्या मुद्यावर निवडणुका जिंकू असे त्यांना वाटत आहे. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना राम किंवा अल्ला मतदान करायला येणार नाही. हे त्यांनी लक्षात ठेवावे. जर आगामी निवडणूक 2019 मध्ये प्रभू रामाच्या मुद्यावर निवडणुका जिंकता येतील, असे त्यांना वाटत असेल, तर राम किंवा अल्ला त्यांना मदत करणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

दरम्यान, राम मंदिर उभारणीसाठी खासगी विधेयक आणण्यात येईल, असे भाजपच्या एका खासदाराने सांगितल्यानंतर अब्दुल्ला यांनी हे विधान केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

SCROLL FOR NEXT