ram mandir
ram mandir File Source
देश

राम मंदिर दर्शनासाठी लवकरच होणार खुले; तारीख आली समोर

विनायक होगाडे

नवी दिल्ली : गेल्या अनेक दशकांपासून राम मंदिर हा राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांचं राष्ट्रीय राजकारण अयोध्येतील भव्य राममंदिराभोवतीच फिरत आहे. राम मंदिरांचं भुमिपूजन नुकतंच पार पडलं आहे. आणि आता बहुचर्चित राममंदिर हे डिसेंबर २०२३ पर्यंत भक्तांसाठी उघडे होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तर अयोध्येमधील संपूर्ण राममंदिराचा परिसर हा २०२५ पर्यंत बांधून पुर्ण होईल. म्युझियम, डीजीटल अर्काईव्ह आणि रिसर्च सेंटर या सगळ्याचा मंदिर परिसरात समावेश असणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राम मंदिराचा मुद्दा निश्चितपणे ऐरणीवर आणण्याच्या तयारीत आहे. सध्या राम मंदिराचं बांधकाम गतीने सुरु आहे. राम मंदिराच्या गाभाऱ्याचं बांधकाम 2023 पर्यंत पूर्ण व्हावं यासाठी सध्या युद्धपातळीवर काम सुरु आहे. पूर्ण बांधकाम व्हायच्या आधीच या गाभाऱ्यामध्ये राम लल्ला, सीता आणि लक्ष्मण यांच्या मुर्त्या 2023 मध्ये स्थापन करण्याचा भाजपचा मानस आहे. आणि त्यानंतर मंदिराचं उर्वरित बांधकाम पूर्ण केलं जाईल.

लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीच देशातील तसेच जगभरातील भाविकांना दर्शणासाठी गाभारा खुला करण्यात येणार आहे. जेणेकरुन गेली कित्येक वर्षे ज्या मुद्यांवर राजकारण करत भाजप देशाच्या सत्तेवर पोहोचला ते वचन पूर्ण केलेलं लोकांना पहायला मिळेल. आणि 2024 च्या लोकसभेमध्ये पुन्हा त्याचा फायदा पक्षाला व्हावा, असा हेतू दिसून येतो आहे. एकूण मंदिराचं बांधकाम 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT