Ramdas Athwale
Ramdas Athwale 
देश

Modi Cabinet : आठवलेंना आला फोन; मंत्रिमंडळात दानवे आणि धोत्रेही

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना आज (गुरुवार) मंत्रिमंडळातील समावेशाबाबत पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. याबरोबरच अकोल्याचे खासदार संजय धोत्रे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचाही समावेश निश्चित आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान कार्यालयातून फोनवरून आठवले यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. खातेवाटपामध्ये कॅबिनेट किंवा स्वतंत्र कार्यभार अशी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. राष्ट्रपती भवनात सायंकाळी 7 वाजता शपथविधी सोहळ्याचा हा दिमाखदार कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्या अनेकांना केंद्रीय मंत्री म्हणूनही शपथ देण्यात येणार आहे.

रावसाहेब दानवे यांचा समावेश निश्चित समजला जात आहे. मोदी सरकार जनताभिमुख उपक्रम अधिक वेगाने राबवेल. त्यांच्या नेतृत्वात नवभारत तयार करण्याचे काम करू, असे दानवे यांनी सांगितले. जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाचवा विजय मिळवत रावसाहेब दानवे यांनी रेकॉर्ड केला आहे. अडीच लाखाहून अधिक मताधिक्‍य मिळवत काँग्रेसच्या विजय औताडे यांचा पराभव करत दानवे यांनी आपली जागा राखली. सलग पाचव्यांदा विजयी होणारे रावसाहेब दानवे यांचा आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडाळात समावेश होणार आहे.

मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याबद्दल भाजपकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. दुपारपर्यंत कोणाचा समावेश होणार हे स्पष्ट नव्हते. अखेर शपथविधीला काही तास शिल्लक असताना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणाऱ्या संभाव्य खासदारांना दूरध्वनीवरून निरोप देत आमंत्रित केल्याची माहिती आहे. रावसाहेब दानवे यांना देखील अमित शहा यांचा फोन आल्याने त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश निश्‍चित समजला जातो. तसेच संजय धोत्रे आणि रामदास आठवले यांनाही फोन आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT