उत्तराखंड
उत्तराखंड उत्तराखंड
देश

Video: उत्तराखंडमध्ये नदीवरील पूल पडल्याने गाड्या वाहू लागल्या

प्रमोद सरवळे

राणीपोखरी ते ऋषीकेश महामार्गावर हा पूल आहे. सध्या या मार्गावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे

डेहराडून: उत्तराखंडमध्ये अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत. बऱ्याच नद्यांना पूरही आले आहेत. गुरुवारी सकाळच्या सुमारास जाखान नदीवरील पूल खचल्याने भीषण अपघात घडला आहे. पूलावरून जाणारी वाहने नदीत पडली आहेत. राणीपोखरी ते ऋषीकेश महामार्गावर हा पूल आहे. सध्या या मार्गावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. हा पूल पडल्याने ऋषीकेष ते देहराडूनचा संपर्क तुटला आहे.

अपघातानंतर तत्काळ घटनास्थळी पोलिस पोचल्याने त्यांनी मदतकार्य सुरू केले होते. नदीतील पाण्याचा वाढता प्रवाह आणि त्याच्य वेगामुळे पूलाचा हा भाग पडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पूलाखाली अडकलेल्या गाड्या काढण्याची मोहिम सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. प्रशासनाच्या माहितीनुसार हा पूल १९६४ साली बांधला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT