Karnataka  sakal
देश

Karnataka : रा. स्व. संघाच्या बैठकीवरून वाद;केंद्रीय विद्यापीठात आयोजनास परवानगी दिल्याने काँग्रेसची टीका

कर्नाटकातील गुलबर्ग्याजवळील कर्नाटक केंद्रीय विद्यापीठात १८ जुलै रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा.स्व. संघ) बैठक झाली होती. आता या बैठकीमुळे वादाला तोंड फुटले आहे. कर्नाटक केंद्रीय विद्यापीठाच्या अतिथिगृहात दुपारी चार ते सात दरम्यान ही बैठक झाली.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : कर्नाटकातील गुलबर्ग्याजवळील कर्नाटक केंद्रीय विद्यापीठात १८ जुलै रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा.स्व. संघ) बैठक झाली होती. आता या बैठकीमुळे वादाला तोंड फुटले आहे. कर्नाटक केंद्रीय विद्यापीठाच्या अतिथिगृहात दुपारी चार ते सात दरम्यान ही बैठक झाली. यावेळी सुमारे १०० विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. रा. स्व. संघाचा १०० वा वर्धापन दिन साजरा करण्याबाबतच्या नियोजनाविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.

याबैठकीनंतर कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापनावर टीका केली आहे. खर्गे यांनी ‘एक्स’वर या बैठकीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘‘कर्नाटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कर्नाटक केंद्रीय विद्यापीठाची स्थापना मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली होती. मात्र सध्या येथे दर्जेदार शिक्षण देण्याऐवजी ते ‘सीयूके’मध्ये बदलले आहे. याला आळा घालण्याची गरज आहे,’’ असे मत प्रियांक यांनी व्यक्त केले आहे. गेल्या दशकभरात, सरकारी संस्थांमध्ये प्रचारकांची घुसखोरी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, ज्यामुळे व्यवस्थेचा संपूर्ण ऱ्हास झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

रा. स्व. संघावर बंदी नाही

प्रियांक खर्गे यांच्याकडून टीका करण्यात आल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू बट्टू सत्यनारायण यांनी त्यांची बाजू मांडली आहे. ‘‘रा. स्व. संघ ही बंदी घालण्यात आलेली संघटना नाही,’’ असे सांगून सभेला परवानगी देण्याच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ काही गटांना कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देऊन, इतरांना मात्र परवानगीस नकार देऊ शकत नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला आहे.

दरम्यान, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशननेही(एआयएसएफ) विद्यापीठात रा. स्व संघाच्या बैठकीस परवानगी दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. अशा पद्धतीने बैठकांना परवानगी देऊन शैक्षणिक जागेचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा एआयएसएफ ने केला आहे. तसेच एआयएसएफने, रा. स्व. संघाला बैठक घेण्यास परवानगी दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाचा निषेधही केला आहे. कुलगुरू सत्यनारायण यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT