Ratan Tata sakal
देश

Ratan Tata : निवृत्तीचा दिवस कामगारांसोबत

रतन टाटा यांनी स्वतःच्या ७५ व्या वाढदिवसाच्या दिवशी टाटा उद्योगसमूहाची सूत्रे सायरस मिस्त्री यांच्याकडे सोपविल्यानंतर कंपनीतील शेवटचा दिवस टाटा मोटर्सच्या पिंपरी प्रकल्पातील कामगारांसोबत घालविला होता.

सकाळ वृत्तसेवा

रतन टाटा यांनी स्वतःच्या ७५ व्या वाढदिवसाच्या दिवशी टाटा उद्योगसमूहाची सूत्रे सायरस मिस्त्री यांच्याकडे सोपविल्यानंतर कंपनीतील शेवटचा दिवस टाटा मोटर्सच्या पिंपरी प्रकल्पातील कामगारांसोबत घालविला होता. स्वतःचा वाढदिवस असूनही त्यांनी कामगारांसोबत साधे भोजन घेतले. कंपनीतील प्रत्येक कामगाराची भेट घेत त्यांनी दिलेल्या भेटवस्तूंचाही प्रेमाने स्वीकार केला होता. ‘हा दिवस आपल्या कायम स्मरणात राहील,’ असे कामगारांना सांगताना टाटा अक्षरशः गहिवरले होते.

लग्न करायचेच राहून गेले

‘मी अविवाहित असलो तरी माझेही एकीवर जिवापाड प्रेम होते, आम्ही लग्न करणार होतो. पुढे मी भारतात आलो अन् ती अमेरिकेतच राहिली. भारत आणि चीनचे युद्ध सुरू झाल्याने ती भारतामध्ये येऊ शकली नाही. पुढे मी देखील अमेरिकेत गेलो नाही अन् तिने मात्र लग्न केले. पुढे मी लग्न करण्याचा चार वेळा प्रयत्न केला होता,’ असे रतन टाटा यांनी एकदा ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

दुसऱ्यांदा लढाऊ विमानातून

रतन टाटा यांनी बंगळूरमध्ये सलग दोनदा लढाऊ विमानात बसण्याचा अनुभव घेतला होता. लॉकहीड मार्टिन कंपनीच्या ‘एफ-१६’ या लढाऊ विमानातून त्यांनी ४० मिनिटे सहवैमानिक म्हणून प्रवास केला होता तर बोइंग कंपनीच्या ‘एफ-१८ सुपर हॉर्नेट’ विमानाचा थरार त्यांनी तासभर अनुभवला होता. अमेरिकी नौदलातून निवृत्त झालेले वैमानिक डोड नेल्सन हे त्यांचे मुख्य वैमानिक होते. ‘इट वॉज टेरिफिक’ या शब्दांत रतन टाटा यांनी या उड्डाणाचे वर्णन केले होते.

शाही मित्र, शाही मैत्री

इंग्लंडचे राजपुत्र चार्ल्स यांच्या दुसऱ्या विवाहासाठी तीन भारतीयांना निमंत्रित करण्यात आले होते त्यामध्ये रतन टाटा यांचा देखील समावेश होता. राजपुत्र चार्ल्स यांच्याशी त्यांचे घनिष्ठ मैत्रीसंबंध होते. नेहरू- गांधी घराण्याशीही त्यांची चांगलीच मैत्री होती. जेआरडींचे वडील आरडी टाटा यांची मोतीलाल नेहरू यांच्याशी मैत्री होती. खुद्द जेआरडींना पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचा स्नेह लाभला होता.

कोण होते रतन टाटा?

  • २८ डिसेंबर १९३७ रोजी सुनू आणि नवल टाटांच्या पोटी मुंबईत रतन टाटांचा जन्म झाला. रतन हे जमशेटजी टाटा यांचे पणतू होत.

  • मुंबईतील कॅम्पियन स्कूलमध्ये आठवीपर्यंत शिक्षण, त्यानंतर त्यांनी मुंबईतील ‘कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल’, सिमल्यातील बिशप कॉटन स्कूलमध्ये धडे गिरवले.

  • दहा वर्षांचे असताना त्यांचे वडील नवल आणि आई सुनू विभक्त झाले. त्यानंतर आजी नवाजीबाई टाटा यांनी त्यांचे पालनपोषण केले.

  • शिक्षणानंतर ते १९७० मध्ये टाटा समूहात दाखल झाले. नेल्कोतून कामास सुरुवात केली.

  • जेआरडी टाटांनी १९९१ मध्ये आपला वारसदार म्हणून रतन टाटांचे नाव घोषित केले.

असाही साधेपणा

  • कार्यालयात जाण्यासाठी साध्या मोटारीचा वापर

  • सुटीचा दिवस समुद्र किनारी एकांतात घालवीत

  • निवांतक्षणी दोन आवडत्या कुत्र्यांसोबत खेळत

  • दूरचा प्रवासही ते एकट्यानेच करत असत

  • अमेरिकेत असतानाही छोट्या फ्लॅटमध्ये वास्तव्य

  • उच्चपदावर असतानाही कुलाब्यात साध्या फ्लॅटमध्ये राहिले

  • परदेशात असताना ताज समूहाच्या हॉटेलातच वास्तव्य

  • माध्यमांच्या प्रसिद्धी झोतापासून जाणीवपूर्वक दूर राहत

दोनदा समूहाचे अध्यक्ष

  • जमशेटजी टाटा (१८६८-१९०४)

  • सर दोराबजी टाटा (१९०४-१९३२)

  • सर नवरोजी सकलातवाला (१९३२-१९३८)

  • जे.आर.डी. टाटा (१९३८-१९९१)

  • रतन टाटा (१९९१-२०१२)

  • सायरस मिस्त्री (२०१२-२०१६)

  • रतन टाटा (२०१६-२०१७)

  • नटराजन चंद्रशेखरन (२०१७ पासून)

निवडक गौरव

  • २००० - पद्मभूषण

  • २००८ - पद्मविभूषण

  • २००१ - मानद डॉक्टरेट, ओहिओ

  • २००४ - उरुग्वे सरकारचे पदक

  • २००४ - मानद डॉक्टरेट (एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी)

  • २००५ - मानद डॉक्टरेट, वॉरविक

  • २००६ - मानद डॉक्टरेट (आयआयटी, मद्रास)

  • २००८ - मानद डॉक्टरेट (केंब्रिज)

  • २००८ - मानद डॉक्टरेट (आयआयटी मुंबई)

  • २००८ - मानद डॉक्टरेट (आयआयटी खरगपूर)

  • २००८ - मानद नागरिकत्व (सिंगापूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळच्या राजाची गुलाल उधळत मिरवणूक; लालबागचा राजाही मंडपातून निघाला...

Satara Ganpati Visarjan Video : भगवान शंकराची कृपा? मामाच्या डोक्यावर सुरक्षित नाचतो गणपती! पाहा अद्भुत क्षण

Latest Maharashtra News Updates : मोदींच्या आदेशाला सरनाईकांकडून केराची टोपली, टेस्ला कार खरेदीनंतर विरोधक तुटून पडले

TET Exam : टीईटी बंधनकारक, प्रमोशन नाहीच; सरकारच्या भूमिकेनंतर शिक्षण विभाग काढणार आदेश

'मी रात्री फोन केला अन् म्हटलं, लग्न करशील?' किशोरी शहाणेची लव्हस्टोरी माहितीय का? सांगितला खास किस्सा

SCROLL FOR NEXT