Ratan Tata 
देश

Ratan Tata Death Cause : रतन टाटांच्या जाण्याने देशभर हळहळ; त्यांना नेमका आजार काय होता?

Ratan Tata death Latest News : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. सकाळी १० वाजता हलेकाय येथून टाटा यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल.

रोहित कणसे

उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. रात्री उशिरा टाटांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित रतन टाटा यांचे दक्षिण मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात रात्री साडेअकरा वाजता निधन झाले.

याआधी ७ ऑक्टोबर रोजी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, रतन टाटा यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांचे ब्लड प्रेशर कमी झाले आहे. मात्र नंतर रतन टाटा यांच्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करण्यात आली होती की, मी बरा आहे आणि वय वाढल्याने रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेलो होतो, काळजी करण्याचे काही कारण नाही. मात्र काल रात्री अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले.

कोणता आजारा होता?

मिळालेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचे ब्लड प्रेशर डाऊन झाले होते, लो बीपीमुळे त्यांची तब्येत बिघडली होती. हार्ट रोग तज्ज्ञ डॉ. शारुख अस्पी गोलवाला यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. वाढत्या वयामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर देखील त्यांना वाचवणे शक्य झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, लो ब्लड प्रेशरमुळे ते हायपोटेंशनने ग्रस्त होते. ज्यामुळे शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. वृद्धांना अशा प्रकारच्या समस्या जास्त प्रमाणात उद्भवतात. रिपोर्ट्सनुसार रतन टाटांच्या शरीरात डिहायड्रेशनची समस्या देखील झाली होती.

रतन टाटांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दुखः व्यक्त केले आहे. रतन टाटा हे जगतील सर्वात प्रभावशाली उद्योजकांपैकी एक होते, असे असले तरी जगभरातील कोट्यधिशांच्या कुठल्याच यादीत रतन टाटांचे नाव कधीच दिसले नाही. त्यांच्याकडे ३० हून अधिक कंपन्या होत्या ज्या सहा खंडातील १००हून अधिक देशात पसरल्या आहेत. असे असतना देखील रतन टाटा अत्यंत साधे जीवन जगत होते.

अंत्यदर्शन कुठे घेता येईल?

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. सकाळी १० वाजता हलेकाय येथून टाटा यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल. सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल.

एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक २ मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल. दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. सायंकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोड करत ही अंत्ययात्रा वरळी येथील स्मशानभूमीत पोहचेल. सायंकाळी ४.३० वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT