देश

VIDEO: पॅनेशिया बायोटेक आणि RDIF ने सुरु केलं स्पुटनिकचं भारतात उत्पादन

विनायक होगाडे

आरडीआयएफ (RDIF) आणि पॅनेशिया (Panacea Biotec) बायोटेकने स्पुटनिक-व्हीचे भारतात उत्पादन (Sputnik V in India) सुरु केलं आहे. भारतातील पॅनेशिया बायोटेक आता प्रत्येक वर्षी देशात 10 कोटी डोस तयार करु शकते. रशियाद्वारे तयार केली गेलेली ही कोरोनाप्रतिबंधक लस कोरोनाच्या विषाणूविरोधात परिणामकारक मानली जात आहे. (RDIF and Panacea Biotec launch the production of Sputnik V in India)

सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटद्वारे तयार केली गेलेली कोविशील्ड आणि भारत बायोटेकद्वारे विकसित केली गेलेली कोवॅक्सिन लशीद्वारे भारतातील लसीकरण मोहिम सुरु आहे. आता देशातील या लसीकरणाच्या मोहिमेला स्पुटनिक-व्ही लशीची देखील मदत मिळणार आहे. यामुळे देशातील मोठ्या लोकसंख्येचं लवकरात लवकर लसीकरण करणं शक्य होणार आहे.

भारताला आतापर्यंत स्पुटनिकचे दीड लाख डोस आणि त्यानंतर आणखी 60 हजार अतिरिक्त डोस पुरवण्यात आले आहेत. तसंच मे अखेरपर्यंत 30 लाख डोस पुरवण्यात येतील. तर ऑगस्टमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन 50 लाख इतका पुरवठा होण्याची अपेक्षा असल्याचं रशियाच्या सेंट पिटर्सबर्गमधील भारतीय राजदूतांनी म्हटलं आहे. भारतात 850 दशलक्ष स्टुटनिक लशीचे डोस तयार करण्याची योजना आहे. जगभरात तयार होणाऱ्या स्पुटनिक लशीचं 65 ते 70 टक्के उत्पादन हे भारतातच होईल असंही राजदूत डी बाला व्यंकटेश वर्मा यांनी सांगितलं. स्पुटनिक लशीचे उत्पादन भारतात तीन टप्प्यात होईल. यामध्ये पहिल्या टप्प्यात रशियातून पूर्ण पणे तयार लस आयात केली जाणार आहे. ही प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात RDIF मोठ्या प्रमाणात भारतात पाठवण्यात येईल. ते वापरण्यासाठी तयार असेल मात्र ते लशीच्या बॉटल्समध्ये भरावं लागेल. तिसऱ्या टप्प्यात रशिया त्यांचे तंत्रज्ञान भारतीय कंपन्यांनी देईल. त्यानंतर भारतीय कंपनी स्पुटनिकचे उत्पादन भारतात करेल. असे मिळून 3 टप्प्यात 850 मिलियन डोस तयार होतील असं व्यंकटेश शर्मा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT