coronavirus 
देश

Coronavirus : कोरोनावर मात करण्यात पुणेकरांची आघाडी 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९१ टक्‍क्‍यांच्याही पुढे गेला असून ऑक्‍टोबरमध्ये यात लक्षणीय सुधारणा झाली आहे, अशी नोंद केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक कार्य विभागाच्या मासिक अहवालात करण्यात आली आहे. कोरोनाला हरविणाऱ्यांची संख्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३ लाख ७७ हजारांवर पोहोचल्याचेही यात नमूद केले आहे. 

महाराष्ट्र सरकारने रास्त दरात कोरोना चाचण्या उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासारख्या उपाययोजनाही राबविल्या आहेत. परिणामी राज्यात ऑक्‍टोबरपासून कोरोना बाधितांचे प्रमाण घटले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रुग्णांच्या संख्येत घट 
यंदा सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्‍टोबरमध्ये नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घसरण झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांमध्येही स्थिती सुधारल्याचे यात म्हटले आहे. त्याच वेळी दिल्लीसह कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांनी कोरोना निर्मूलनासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरजही यात नमूद केली आहे. या अहवालानुसार, महाराष्ट्रात १० लाख लोकांमागे १३ हजार ९४५ कोरोनाबाधित आढळत आहेत. यातील ६.३ टक्के रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९१.१ टक्के इतकी वाढली आहे. मृत्यूमुखी पडणाऱ्यांची टक्केवारी २.६ तर आठवड्याला सरासरी रुग्णवाढीचा दर ०.३ टक्के इतका कमी झाल्याचे आढळले आहे. दर १० लाख लोकांमागे ७५ हजार ७२७ कोरोना चाचण्या केल्या जात असून आतापर्यंत ९२ लाख ५० हजार २५४ चाचण्या करण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे. 

साडेपंधरा लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनामुक्त 
रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही राज्यात लक्षणीय सुधारणा झाल्याचे हा अहवाल सांगतो. राज्यभरात आतापर्यंत १५ लाख ५१ हजार २८२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुणे जिल्हयात ३ लाख ७६ हजार २०८, मुंबईमध्ये २ लाख ३४ हजार ५५१, ठाणे जिल्हयात २ लाख ४ हजार ६९०, नागपूर जिल्ह्यात ९६ हजार ८८८ आणि नाशिक जिल्ह्यात ९१ हजार ५०७ जण कोरोनाच्या विळख्यातून सुटले असल्याचे यात दिसून आले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT