

Farmers Face Financial and Emotional Loss
esakal
राज्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात देखील दुष्काळाची तीव्रता आता केवळ पिकांपुरती मर्यादित राहिलेली नसून त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या संसारासोबत पशुधनावरही होताना दिसत आहे. बेल्हे येथील प्रसिद्ध बैल बाजारात दुष्काळाचे हे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. चारा आणि पाण्याची व्यवस्था करणे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस कठीण होत असल्याने अनेक शेतकरी जीवापाड जपलेल्या बैलांना विक्रीसाठी बाजारात घेऊन येत आहेत.