Narendra Modi sakal
देश

Redevelopment Plan : स्थानकांच्या पुनर्विकास योजनेला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ; १९ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित

देशातील तीनशेपेक्षा जास्त जिल्ह्यांतील ५५३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आली.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशातील तीनशेपेक्षा जास्त जिल्ह्यांतील ५५३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आली. याशिवाय रेल्वे स्थानक परिसरातील १५८५ उड्डाणपूल आणि अंडरपासचे लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

रेल्वेशी संबंधित दोन हजारांपेक्षा अधिक योजनांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले. ‘रालोआ-३’ सरकारचा कार्यकाळ पुढील जून महिन्यापासून सुरु होणार आहे. मात्र ज्या प्रमाणात आणि वेगाने काम सुरु आहे ते आश्चर्यजनक आहे. या सर्व प्रकल्पांसाठी ४१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील गोमती नगर रेल्वे स्थानकाचे उद्घाटन देखील करण्यात आले. दशकभरापूर्वी ‘वंदे भारत’ आणि ‘नमो भारत’ सारख्या आधुनिक आणि शानदार रेल्वेगाड्यांची कोणी कल्पनाही केली नसेल. मात्र हे स्वप्न साकार झाले आहे. त्याप्रमाणे आगामी काळात अमृत भारत रेल्वे स्थानके नागरिकांना पहावयास मिळणार आहेत, असे मोदी म्हणाले.

रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी सुमारे १९ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. फूटओवर ब्रीज, कॉनकोर्स, वाढीव प्लॅटफॉर्म, सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग, दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा, प्रकाश व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता, संकेत आणि दिशानिर्देश फलके, ट्रेन डिस्प्ले, सौंदर्यीकरण, फूडकोर्ट अशा विविध प्रकारच्या सोयी सुविधा प्रवाशांना रेल्वे स्थानकांमध्ये मिळणार आहेत.

राज्यातील १२३ स्थानके

महाराष्ट्रातील १२३ स्थानकांचा समावेश अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेत करण्यात आला आहे. यात अकोला, नगर, अंधेरी, छत्रपती संभाजीनगर, वांद्रे टर्मिनस, बारामती, बेलापूर, भोकर, बोरिवली, भायखळा, चाळीसगाव, चंद्रपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चिंचवड, दादर, दौंड, धामणगाव, धुळे, दिवा, गोंदिया, हडपसर, हातकणंगले, नांदेड, हिंगोली, इगतपुरी, जालना, कल्याण, कांजूरमार्ग, कराड, किनवट, कोल्हापूर, कोपरगाव, कुर्डुवाडी, कुर्ला, लासलगाव, लातूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणंद, लोणावळा, लोअर परेल, मालाड, मलकापूर, मनमाड, मरिन लाइन्स, मिरज, मुदखेड, मुंबई सेंट्रल, मुर्तजापूर, नागपूर, नाशिक रोड, धाराशिव, पाचोरा, पंढरपूर, परभणी, परळ, परळी वैजनाथ, पुलगाव, पुणे, साईनगर शिर्डी, सांगली, सातारा, सेवाग्राम, शहाड, शेगाव, शिवाजीनगर पुणे, सोलापूर, तळेगाव, ठाणे, टिटवाळा, तुमसर रोड, उरळी, विक्रोळी, वर्धा, वाशिम, वाठार या स्थानकांचा समावेश आहे.

वस्त्रोद्योगाला सहकार्य करण्याचे धोरण - मोदी

देशातील वस्त्रोद्योगाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘भारत टेक्स २४’ आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी सांगितले.

वस्त्रोद्योगाचे मूल्य बारा लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. ते म्हणाले, ‘‘शेतकरी, महिला, गरीब व युवक हे विकसित भारताचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. हे तिन्ही घटक वस्त्रोद्योगांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे ‘भारत टेक्स’चे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते. गत दहा वर्षात कापड उद्योगांची २५ टक्के दराने वृद्धी झाली आहे.

या उद्योगातील गुणवत्ता नियंत्रणाकडे सरकारचे लक्ष असून, या क्षेत्रातील लोक व बाजारपेठ यांच्यातले अंतर कमी करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी थेट विक्री, प्रदर्शन, ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. आगामी काळात सात पीएम मित्र पार्क उभारले जातील.’’ या प्रदर्शनात शंभर देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत, असे वस्त्रोद्योग खात्याच्या सचिव रचना शहा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT