Kidney Stone
Kidney Stone Sakal
देश

हैदराबादमध्ये 56 वर्षाच्या व्यक्तीचे 1 तासात 206 मुतखडे काढले बाहेर

सकाळ डिजिटल टीम

हैद्राबाद : तेलंगणातील अवेअर ग्लेनिगल्स ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी किहोल शस्त्रक्रियेद्वारे 56 वर्षीय रुग्णाच्या किडनीतून तब्बल अवघ्या एका तासात 206 मुतखड्याचे तुकडे (Kidney Stone) बाहेर काढले आहेत. कीहोल सर्जरीच्या माध्यामातून हे खडे बाहेर काढण्यात आले आहेत. या रुग्णाला मागच्या काही महिन्यांपासून हा त्रास होत होता पण उन्हाळ्यात हा त्रास जास्त वाढल्याने त्याने हॉस्पिटल गाठलं होतं.

तेलंगणातील नालगोंडा येथील रहिवाशी असलेले 56 वर्षाचे वीरमल्ला रामलक्ष्मैया यांनी 22 एप्रिल रोजी अवेअर ग्लेनिगल्स ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क साधला आणि आपल्या त्रासाबद्दल सांगितले होते. ते याआधी स्थानिक डॉक्टरांनी दिलेले औषध घेत असल्याचं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं होतं. त्या औषधांमुळे त्यांनी तात्पुरता दिलासा मिळत होता पण त्यांचा हा त्रास वाढत होता. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

अवेअर ग्लेनिगल्स ग्लोबल हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट सल्लागार डॉ. पूला नवीन कुमार यांनी या उपचारावर बोलताना सांगितलं की, "प्राथमिक तपासणीतून त्यांच्या कंबरेच्या डाव्या बाजूला मुतखडा असल्याचं दिसलं आणि त्यानंतर सीटीस्कॅन केल्यावर मुतखडा असल्याची पुष्टी झाली होती. त्यानंतर रूग्णाचे समुपदेशन करण्यातं आलं आणि एका तासाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्याच्या किडनीतून मुतखड्याचे तब्बल २०६ तुकडे काढण्यात आले. त्यानंतर रुग्णाला तात्काळ आराम मिळाला आणि दुसऱ्या दिवशी त्याची रुग्णालयातून सुटका करण्यात आली." असं पूला कुमार यांनी सांगितलं.

उन्हाळ्याच्या दिवसातील वाढत्या तापमानामुळे अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो, ज्यामुळे किडनीमध्ये खडे तयार होतात. यावर उपाय म्हणून उन्हाळ्यात जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT