Republic Day Parade 2024 esakal
देश

Republic Day Parade 2024 : चिपळूणचे विघ्नहर्ता महिला वादक पथक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आघाडीला

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच या कर्तव्य पथावर १०० हून अधिक महिला कलाकारांनी भारतीय वाद्ये वाजवून या परेडची सुरूवात केली आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Republic Day Parade 2024 : आज आपला भारत देश ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. नुकतीच दिल्लीतील कर्तव्य पथावर परेडला सुरूवात झाली असून ही सुरूवात ‘आवाहन’ नाने झाली आहे.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच या कर्तव्य पथावर १०० हून अधिक महिला कलाकारांनी भारतीय वाद्ये वाजवून या परेडची सुरूवात केली आहे. या महिला कलाकारांनी शंख, नादस्वरम, नगाडा, ढोल-ताशा इत्यादी पारंपारिक वाद्ये वाजवून या परेडची सुरूवात केली.

या वादक पथकामध्ये विविध राज्यांतील महिलांचा समावेश दिसून आला. एएनआयने या संदर्भात ट्विट केले असून याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे या महिलांच्या वाद्य पथकामध्ये महाराष्ट्रातील चिपळूणचे विघ्नहर्ता महिला वादक पथक आघाडीला असल्याचे दिसून आले. या महिलांनी ढोल-ताशा, शंख इत्यादी वाद्ये वाजवत या परेडची दिमाखात सुरूवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT