देश

ओडिशात सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष; दोन डझन जुन्या मूर्तींचा समावेश

विनायक होगाडे

भुवनेश्वर : ओडिशातील भुवनेश्वर-पुरी रस्त्यावर लौडंकी गावात प्राचीन खजिना सापडल्याचा दावा रिडिस्कव्हर लॉस्ट हेरिटेज या पथकाने केला. प्राचीन मूर्ती व मंदिराचे अवशेष सापडल्याचा पथकाचा दावा आहे. या पथकात सहा जणांचा समावेश असून पथक रत्नाचिरा खोऱ्यात सर्वेक्षण करत होते. यावेळी, लौडंकीत गातेश्वर मंदिराच्या परिसरात या मूर्ती सापडल्या. हे मंदिर ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून अवघ्या ४० कि.मी.वर आहे.

या पथकात प्राचीन इमारतींचे वास्तुतज्ज्ञ अलौकिका मोहंती, सुभाषिश दास, सुमन प्रकाश स्वेन व सीताकांत मिश्रा यांचा समावेश होतो. पथकाचे प्रमुख अनिल धीर म्हणाले की, मंदिराच्या स्वयंपाकघराच्या मागील बाजूस कचऱ्याच्या एका मोठ्या ढिगाऱ्याखाली जवळपास दोन डझन प्राचीन मूर्ती सापडल्या. यापूर्वी, पथकाने प्राचीन मंदिराभोवती विखुरलेले कोरीव दगडी अवशेषही शोधले. रिडिस्कव्हर लॉस्ट हेरिटेजचे मुख्य समन्वयक आणि या रत्नाचिरा प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या दीपक कुमार नायक यांनीही यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, की या मूर्तींमध्ये कार्तिकेयची मयूरासनातील तीन फूट उंचीची मूर्ती, गणपती व महिषासूरमर्दिनीच्या प्रत्येकी दोन फूट उंचीच्या मूर्तीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, सात फणा असलेली नागाची मूर्ती, मंदिराच्या अवशेषात अलास्यकन्या, ब्रुशाव, नारा विदाल आदींची कोरीव मूर्ती, शंकराचा पितळी मुखवटाही आढळला आहे. यातील मुखवटा वगळता इतर वस्तू नवव्या ते बाराव्या शतकांदरम्यानच्या असण्याच्या अंदाज. सर्व मूर्ती मंदिरामध्ये ठेवण्यात आल्या असून मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत कळविले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

यापूर्वीही सापडले होते अवशेष


ओडिशाच्या पुरातत्व जीर्णोद्धारादरम्यानही या मंदिरात अनेक प्राचीन मूर्ती सापडल्या होत्या. या प्रतिमा वस्तुसंग्रहालयात ठेवल्या जाणार होत्या. मात्र, १९९९ मधील भीषण चक्रीवादळात मंदिर पाण्यात बुडाल्याने मूर्ती वाहून गेल्या. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली काही मूर्ती पुरल्या गेल्या, असे धीर यांनी सांगितले. रत्नाचिरा खोऱ्यात अनेक प्राचीन वस्तूंचा खजिना असल्याचा दावाही त्यांनी केला.

सापडलेल्या प्रमुख मूर्ती
कार्तिकेय (तीन फूट)
गणेश (दोन फूट)
महिषासुरमर्दिनी (दोन फूट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT