Agniveer Yojana sakal
देश

Agniveer Yojana : अग्निवीर योजनेचा फेरआढावा घ्या ; ‘जेडीयू’ची भाजपवर दबाव टाकण्यास सुरुवात

‘नरेंद्र मोदी सरकार ते एनडीए सरकार’ असा प्रवास असलेल्या भाजपचा तिसरा सत्ताकाळ सुरू होण्याआधीच एनडीए आघाडातील मित्रपक्षांचा सरकारच्या धोरणांवर दबाव दिसणे सुरू झाले आहे. अग्निवीर योजनेचा फेरआढावा घ्यावा आणि मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी समान नागरी संहितेच्या मुद्द्यावर सर्व राज्यांशी आधी चर्चा व्हावी, अशी मागणी संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘नरेंद्र मोदी सरकार ते एनडीए सरकार’ असा प्रवास असलेल्या भाजपचा तिसरा सत्ताकाळ सुरू होण्याआधीच एनडीए आघाडातील मित्रपक्षांचा सरकारच्या धोरणांवर दबाव दिसणे सुरू झाले आहे. अग्निवीर योजनेचा फेरआढावा घ्यावा आणि मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी समान नागरी संहितेच्या मुद्द्यावर सर्व राज्यांशी आधी चर्चा व्हावी, अशी मागणी संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केली आहे. तर सत्तास्थापनेमध्ये महत्त्वाच्या खात्यांसाठी आणि लोकसभाध्यक्षपदावरून तेलुगू देसम पक्षानेही दबाव वाढविणे सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.

‘जेडीयू’चे नेते के.सी.त्यागी यांनी आज पत्रकारांशी बोलताना अग्निवीर योजनेचा फेरआढावा घेण्याची मागणी केली. अग्निवीर योजनेला होत असलेला विरोध आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान या विरोधाचा दिसून आलेला परिणाम याचा हवाला देत के.सी.त्यागी यांनी ही मागणी केली.

यासोबतच, समान नागरी संहितेबाबतही त्यांनी ‘जेडीयू’ची भूमिका मांडली. ते म्हणाले, की या मुद्द्यावर सर्व राज्यांशी चर्चा होण्याची गरज आहे. समान नागरी संहितेबाबत राज्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. या मुद्द्यावर आमची भूमिका पूर्वीप्रमाणेच स्पष्ट आहे.

विधी आयोगाला पक्षप्रमुख नितीशकुमार यांनी पत्र लिहून कळविले होते की समान नागरी संहितेला विरोध नाही परंतु व्यापक सल्लामसलत करण्याची गरज आहे. त्यानुसार सर्व राज्यांशी चर्चा व्हायला हवी. ‘एक देश, एक निवडणुकी’साठी संयुक्त जनता दलाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचाही निर्वाळा के. सी. त्यागी यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT