Central Home Ministry sakal
देश

Central Home Ministry : केंद्रीय गृहमंत्र्यांकडून पूरस्थितीचा आढावा;आसाम, उत्तर प्रदेश, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा

मुसळधार पावसामुळे आसाम, उत्तर प्रदेश व गुजरातेत निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला. त्यांनी या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करत केंद्राकडून आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासनही दिले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे आसाम, उत्तर प्रदेश व गुजरातेत निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला. त्यांनी या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करत केंद्राकडून आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासनही दिले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी शहा यांना राज्यातील पूरस्थितीबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे, राज्य सरकारने पुराचा सामना करण्यासाठी कोणती पावले उचलली, हे त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगितले.

उत्तर प्रदेश व गुजरातमध्येही मुसळधार पावसामुळे नद्यांची पातळी वाढत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी केलेल्या चर्चेत शहा यांनी दोन्ही राज्यांतील पुराबद्दल जाणून घेतले. या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले.

आसाममध्ये पूर व संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कछार, चिरांग, दरांग, धुब्री, गोलाघाट, कामरूप आदी जिल्ह्यांत जवळपास सहा लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशातील २२ जिल्ह्यांतील दीड हजार गावांना पुराचा वेढा पडला असून विजा कोसळण्यासह पावसाशी संबंधित इतर दुर्घटनांत अनेकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगासाठी 'ही' तारीख महत्त्वाची; कर्मचाऱ्यांना होणार दुप्पट फायदा

Latest Marathi News Live Update: कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्याचा विवस्त्र व्हिडिओ व्हायरल

INDW vs SAW: भारताची 'संकटमोचक' ऋचा घोषचं शतक ६ धावांनी हुकलं, पण नावावर झाले ३ मोठे विक्रम

Israel announces Gaza ceasefire : ‘’२४ तासांच्या आत गाझामध्ये युद्धबंदी’’ ; अखेर इस्रायलने केली मोठी घोषणा!

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! महागाई भत्त्यामध्ये तब्बल ८ टक्के वाढ

SCROLL FOR NEXT