desh
desh sakal
देश

पंजाबातील शेतकऱ्यांनी रोखले रस्ते

सकाळ वृत्तसेवा/(पीटीआय)

चंडीगड : आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर हरियानात झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज पंजाबमध्ये आंदोलन करण्यात आले. पंजाबातील शेतकऱ्यांनी ५६ ठिकाणी रस्ते आणि महामार्ग दोन तास रोखून धरले. यावेळी त्यांनी हरियाना सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा पुतळाही जाळला. शेतकऱ्यांनी काल हरियानामध्ये केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान दहा जण जखमी झाले. पोलिसांच्या या कृतीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली. या सगळ्या घटनांचा निषेध म्हणून पंजाबातील शेतकऱ्यांनी आज आंदोलन केले. दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय झाली. अनेक ठिकाणी रस्ते अडविले गेल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. जालंधर- पठाणकोट, लुधियाना-चंडीगड, अमृतसर - गंगानगर हे महामार्ग, त्याचबरोबर फिरोजपूर-झिरा हा मार्गही बंद पडला. (National News)

किसान संघर्ष मजदूर समितीचे सरचिटणीस सरवानसिंग पंढेर यांनी हरियाना पोलिसांच्या कृतीचा निषेध केला आहे. ‘‘हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा. शेतकऱ्यांवरील कारवाईनंतर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही,’’ असे त्यांनी अमृतसर येथे आंदोलनावेळी म्हटले आहे.

त्या अधिकाऱ्यावर कारवाई करू

करनाल : शनिवारी करनालमध्ये आंदोलक शेतकऱ्यांची डोकी फोडा असे पोलिसांना ओरडून सांगणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी सांगितले. उपविभागीय दंडाधिकारी आयुष सिन्हा यांच्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजप खासदार वरुण गांधी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून टीका केली जात आहे. चौटाला यांनी सांगितले की, आपण दोन रात्र झोपलो नव्हतो, असा खुलासा संबंधित अधिकाऱ्याने नंतर केला, पण शेतकरी ३६५ दिवस झोपलेले नाहीत हे त्याला माहीत हवे. प्रशिक्षणादरम्यान संवेदनशील राहावे असे धडे त्याला देण्यात आले होते. आम्ही कारवाई करू.

भाजप आमदाराला घेराव

मुजफ्फरनगर (वृत्तसंस्था) : भारतीय किसान युनियनच्या आंदोलकांनी भाजप आमदार विक्रम सिंह यांना घेराव घातला आणि त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. ते मीरापूर दलपत खेड्यात एका सभेला गेले असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. जोगिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विक्रम यांना संरक्षणासाठी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

सिद्धू यांच्याकडून निषेध

काँग्रेसचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी हरियाना पोलिसांच्या कृतीचा निषेध केला आहे. ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांवरील हल्ला म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मूलभूत हक्कांवरील हल्ला आहे. अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य मिळविले आहे. पोलिसांची कृती घटनेतील मूलभूत हक्कांनाच धक्का पोहोचविते. भारतीय लोकशाहीचा कणा त्यामुळे मोडला जात आहे.’’

देशातील तालिबानी शोधले पाहिजेत

हरियानातील कर्नालमध्ये झालेल्या लाठीमाराचा भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी निषेध केला आहे. `देशात सरकारी तालिबान्यांचा कब्जा आहे. हे तालिबानी कमांडर कोण आहेत, हे शोधले पाहिजे. ज्यांनी डोकी फोडण्याचे आदेश दिले तेच कमांडर आहेत,` अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ही सरकारची खोड

``अन्नदात्याचे रक्त सांडणे ही सरकारची सवय झाली आहे. पहिल्यांदा सरकार जाणूनबुजून संघर्षाची स्थिती निर्माण करते. त्यानंतर अमानवी पद्धतीने शेतकऱ्यांवर हल्ले करण्यात येतात. अशा प्रकारचे हल्ले होण्याची ही पहिलेच वेळ न्ही, अशी टीका भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी केली आहे.

हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

पोलिसांच्या लाठीमारानंतर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. जखमी झालेल्या या शेतकऱ्याला नंतर हृदयविकाराचा झटका आला, त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. सुशील असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत शेतकरी नेते गुरनामसिंह चढूनी म्हणाले, ``सुशील हा बसताडा टोल प्लाझा येथील आंदोलनावेळी उपस्थित होता. पोलिसांच्या लाठीमारात तो जखमी झाला. त्यामुळे त्याला रात्री हृदयविकाराचा झटका आहे आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचे बलिदान कायम स्मरणात राहील.``

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT