देश

चिक्कोडी तालुक्यात नणदी येथे 18 ताेळे दागिण्याची चाेरी

सकाळवृत्तसेवा

चिक्काेडी - एकसंबा चिक्कोडी मार्गावरील नणदी ते नणदीवाडी दरम्यान रस्त्यालगत असलेल्या नारायण प्रभाकर कुलकर्णी त्यांच्या फार्महाऊसवर चोरट्यांनी रविवारी भरदिवसा डल्ला मारीत सुमारे १८ तोळय़ाचे सोन्याचे दागिने लंपास केले.

याबाबत पाेलिसांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, नारायण कुलकर्णी कुटुंबीय रविवारी कागल येथे घरगुती कार्यक्रमाकरिता गेले होते. या फार्महाऊसवर कोणीच नसल्याचे पाहून चोरट्यांनी फार्महाऊसचा मागील दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला व दोन तिजोऱ्या फोडून त्यातील १८ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी सायंकाळी निदर्शनास आली. या घटनेची नोंद सदलगा पोलिस स्थानकात झाली असून घटनास्थळी मंडल पोलिस निरीक्षक व्ही. के. मुकतीहाळ, पाेलिस उपनिरीक्षक संगमेश दिडगीनहाळ यांच्यासह पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT