नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर पक्षाची दयनीय अवस्था असताना प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वद्रा यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर काँग्रेस पक्ष नेतृत्वहिन झाला आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी राहुल यांच्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहून त्यांचं कौतूक केले आहे.
वद्रा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, की राहुल, मला आपल्याकडून खूप काही शिकायला मिळाले आहे. देशाच्या 65 टक्के तरूणांना आपल्यावर आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे. तुम्ही मागे हटू नका. आपल्या दृढसंकल्प व्यक्तिमत्वाचा आपण आम्हाला परिचय दिलात. आपण जमिनीवर राहून काम केलंत, ही गोष्ट खूप वाखण्यासारखी आहे.
भाजपने मला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी मी माझ्या कामापासून दूर पळणार नाही. सर्वसामान्यांसाठी आणि लोकशाहीसाठी मी कायम खंबीरपणे उभा राहिल, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.