Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Admiral Dinesh Kumar Tripathi: नौदल उपप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅट ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते. त्यांनी आयएनएस विनाशचेही नेतृत्व केले.
Admiral Dinesh Kumar Tripathi
Admiral Dinesh Kumar TripathiEsakal

व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी मंगळवारी नवे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. आर हरी कुमार सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्रिपाठी यांनी २६ वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

40 वर्षांच्या कारकिर्दीत त्रिपाठी यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांवर काम केले आहे. त्यांनी यापूर्वी वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर-इन-चीफ म्हणून काम केले आहे. नवी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्रिपाठी हे नौदल उपप्रमुख होते. (Admiral Dinesh Kumar Tripathi)

व्हाइस ॲडमिरल त्रिपाठी यांचा जन्म १५ मे १९६४ रोजी झाला. दिनेश कुमार त्रिपाठी हे रीवा येथील सैनिक स्कूलचे विद्यार्थी आहेत.

1 जुलै 1985 रोजी ते भारतीय नौदलात रुजू झाले. व्हाईस ॲडमिरल त्रिपाठी, कम्युनिकेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर तज्ज्ञ असून, त्यांची कारकीर्द जवळपास 40 वर्षांची आहे.

नौदल उपप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅट ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते. त्यांनी आयएनएस विनाशचेही नेतृत्व केले.

याशिवाय, रिअर ॲडमिरल म्हणून ते इस्टर्न फ्लीटचे कमांडिंग फ्लीट ऑफिसर राहिले आहेत. त्याचबरोबर ते भारतीय नौदल अकादमी एझिमालाचे कमांडंटही राहिले आहेत.

Admiral Dinesh Kumar Tripathi
Viral Video: निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या भाजप नेत्याला अखेर अटक; पाहा व्हिडिओ

नवे भारतीय नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये आमचे नौदल युद्धासाठी सज्ज, एकसंध, विश्वासार्ह आणि भविष्यातील पुरावे म्हणून विकसित झाले आहे.

ते पुढे म्हणाले, भारतीय नौदलाने समुद्रातील संभाव्य शत्रूंना रोखण्यासाठी आणि युद्धे जिंकण्यासाठी नेहमीच तयार असले पाहिजे. हे माझे एकमेव लक्ष आणि प्रयत्न असेल.

नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून आणि विकसित भारताच्या आमच्या सामूहिक प्रयत्नात राष्ट्रीय विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनून मी भारतीय नौदलाच्या 'आत्मनिर्भरते'च्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकट करीन, अशी ग्वाही यावेळी त्रीपाठी यांनी दिली.

Admiral Dinesh Kumar Tripathi
PM Modi: मंगळसूत्रावरून घमासान सुरूच! "ज्यांना कुटुंबच नाही ते मंगळसूत्राचा आदर कसा करणार," बड्या नेत्याचे पंतप्रधानांवर टीकास्त्र

राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासलाचे माजी विद्यार्थी, ॲडमिरल त्रिपाठी यांनी संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय, वेलिंग्टन, नेव्हल हायर कमांड कोर्स, कारंजा आणि युनायटेड स्टेट्समधील नेव्हल कमांड कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहेत.

त्रिपाठी यांनी आतापर्यंत अति विशिष्ट सेवा पदक (AVSM) आणि नौ सेना पदक (NM) मिळवले आहेत.

दरम्यान चार दशकांच्या कारकिर्दीनंतर ॲडमिरल हरी कुमार सेवानिवृत्त झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com