running the ithynol bus on pune mumbai highway
running the ithynol bus on pune mumbai highway 
देश

पुणे-मुंबई महामार्गावर "इथेनॉल बस' धावणार

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - पुणे-मुंबई महामार्गावर लवकरच इथेनॉलचे इंधन वापरून बस धावणार आहेत; तसेच प्रस्तावित दिल्ली-मुंबई एक्‍प्रेस महामार्गावर रेल्वेप्रमाणेच इलेक्‍ट्रॉनिक केबल लावण्यात येणार असून, बस व ट्रक चक्क विजेवर चालविण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्राने आखल्याचे केंद्रीय रस्ते, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले. 

ते म्हणाले, ""इथेनॉलवर वाहने चालविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे. इथेनॉलमुळे इंधनाची बचत होते, प्रदूषणही कमी होते. पुणे-मुंबई महामार्गावर अशा दहा बस धावतील व गोव्यातही ही इथेनॉलची बस धावेल. यासाठी इथेनॉल उत्पादन करण्याबाबत आसाम पेट्रोलियमबरोबर केंद्र सामंजस्य करार करणार आहे. 

गडकरी म्हणाले, ""दरम्यान दिल्ली-जयपूर-अलवर-सवाई माधोपूर-बडोदा व मुंबई यामार्गे जाणाऱ्या नव्या प्रस्तावित माहमार्गावर विजेच्या तारा लावण्यात येतील. रस्तेनिर्मितीवेळीच विशिष्ट भागात या तारा बसविल्या जातील. बस व ट्रक त्यावरून धावतील. सध्या फक्त पेंटाग्राफद्वारे रेल्वेगाड्या व इलेक्‍टिक ट्रॉलींचीच वाहतूक विजेवर होते. रस्त्यावरून धावणारी वाहनेही विजेवरून का चालू नयेत, या विचारातून नव्या योजनेचा प्रस्ताव आहे. दिल्ली-मुंबईच्या नव्या महामार्गावर शेवटच्या लेनमध्ये ही वीजवाहिनी टाकण्यात येईल. त्यामुळे ट्रकच नव्हे, तर जुळ्या बसही विजेवर धावू शकतील. या प्रकल्पाचा व्यावहारिक अभ्यास त्वरित करण्याचे आदेश दिले आहेत. 

ओव्हरलोडिंगला पायबंद घालण्यासाठी नियमावली 
निर्धारित वजनापेक्षा जास्त वजनाचा माल भरून ट्रक पळविण्याच्या प्रकारांना (ओव्हरलोडिंग) पायबंद घालण्यासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. त्यानुसार ट्रकच्या मालवाहतूक क्षमतेतही टक्के वाढ केली आहे. यानंतर निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त माल आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. जकात नाक्‍यांवर वाहनांच्या वजनांची तपासणी करणारी स्वयंचलित यंत्रे लावली जातील. नियमांतील फटींचा आधार घेऊन जादा माल नेण्यास यामुळे प्रकिबंध होईल, असेही गडकरी म्हणाले. नव्या नियमांनुसार याआधी 10 टन माल नेण्याची परवानगी असलेल्या ट्रकना आता 12-13 टन, 16 टन क्षमतेच्या वाहनांना 18 ते 19 टन व 25 टन क्षमतेच्या वाहनांना 28 टनांपर्यंत मालवाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT