Russia Ukraine War sakal
देश

Ukraine Russia War : जग मोजतंय किंमत; तेलाच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ

युक्रेन रशिया वादाचा फटका थेट आपल्या खिशाला बसतोय.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आधी कोरोना आणि आता रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील वादामुळे खाद्यतेलाच्या किमती कमालीच्या वाढल्या आहेत. त्याचा परिणाम आता मोहरीच्या तेलाच्या (Mustard Oil) दरावरही होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. देशभरातील बाजारपेठांमध्ये खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः रिफाइंड आणि सूर्यफूल तेलाच्या किमती गेल्या 15 दिवसांत सुमारे 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 15 दिवसांपूर्वी रिफाइंड ऑईल (Refined Oil Price) 140 रुपये प्रति लिटर होतं, ते आता 165 रुपये प्रति लिटर झालं आहे. सूर्यफूल तेल पूर्वी 140 रुपये होतं, ते आता 170 रुपये झालं आहे. त्याचबरोबर देशी तुपाचा दर पूर्वी 360 रुपये होता, त्यात आता 420 रुपयांनी आणि वनस्पती तेलात 20 रुपयांनी वाढ झाली आहे.

रशिया आणि युक्रेन हे सूर्यफूल तेलाचे सर्वात मोठे उत्पादक आहेत. आधी कोरोना आणि आता युद्धामुळे पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाली आहे. त्याचा परिणाम जगभरातील बाजारपेठांवर दिसून येतोय. खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्यामागे काही कारणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामध्ये रशिया आणि युक्रेन युद्ध, महागडी शिपमेंट, पुरवठा लाइनमध्ये येणाऱ्या अडचणी आणि हिवाळ्यातील पाम तेलाची आयात या सर्व कारणांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय बाजाराच्या व्यवहारांचा अभ्यास असणारे तज्ज्ञ डॉ. रवी सिंग सांगतात की 20% स्वयंपाकाचे तेल युक्रेनमधून येते, त्यामुळे मोहरीचे तेल महाग झाले. मात्र सरकारने आयात खर्च कमी केला होता, त्यामुळे किंमती खाली आल्या, परंतु युक्रेन आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये. त्याचा परिणाम आता पुरवठ्यावर होत असून, मोहरीच्या तेलावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. सध्या परिणाम दिसत नसले तरी नंतरच्या काही महिन्यांत मोहरीच्या तेलाच्या किमतीतही २० टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT