Covid_19_Vaccine 
देश

गुड न्यूज! रशिया 'स्पुटनिक 5' लशीचे 30 कोटी डोस बनवणार भारतात

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली-  देशात लशीकरण सुरु केलेला रशिया भारतातही कोरोना लशीचे उत्पादन करणार आहे. 2021 पर्यंत भारतात 30 कोटी स्पूटनिक 5 लशींचे उत्पादन केले जाणार असल्याची माहिती, रशियाने दिली आहे. यासाठी रशिया भारतातील 4 प्रमुख लस निर्मिती कंपन्यांशी चर्चा करत आहे. लस यशस्वी असल्याची घोषणा करताना रशियाने भारतातही याचे उत्पादन केले जाणार असल्याचे म्हटले होते. 

रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमित्रेव यांनी म्हटलं की, ''2021 मध्ये भारत स्पुटनिक लशीचे 30 कोटी डोस तयार करेल. त्यांनी सांगितले की, यासाठी त्यांनी भारतातील चार कंपन्यांनी बोलणी सुरु केली आहे. भारत पुढील वर्षी 30 कोटी डोस तयार करु शकतो.'' 

PM मोदींनी शेतकऱ्यांसमोर जोडले हात; म्हणाले, 'तुमच्यासमोर नतमस्तक...

रशियाने स्पुटनिक 5 लस 91.5 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. या लशीची निर्मिती करणाऱ्या गमालिया रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी अँड माइक्रोबायोलॉजीने लस कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रभावी असल्याचं म्हटलंय. लशीसंबंधीत ट्रायलचा डाटा लवकरच सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित केला जाणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. रशियाची लस सर्दी-ताप निर्माण करणाऱ्या adenovirus वर आधारित आहे. या लशीचा कृत्रिम पद्धतीने बनवण्यात आले आहे. 

लशीची निर्मिती करणाऱ्या कंपनीने म्हटलं की, चाचणीमध्ये ही लस 91 टक्के प्रभावी ठरल्याचं समोर आलं आहे. जवळपास 23 हजार जणांवर याची चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दुसरीकडे पश्चिम देशांनी चाचणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागातील, वयातील लोकांवर चाचणी घेतली. रशियाच्या लशीवर अनेक देशांनी शंका घेतली आहे.

Hathras Case: चारही आरोपींवर बलात्कार आणि हत्येचा आरोप; CBIकडून चार्जशीट दाखल

दरम्यान, लशीचे नाव रशियाचे पहिले सॅटेलाईट स्पुटनिकवरुन ठेवण्यात आले आहे. 1957 मध्ये रशियन स्पेस एजेंसीने स्पुटनिक नावाचे सॅटेलाईट लॉच केले होते. त्यावेळी रशिया आणि अमेरिकेमध्ये स्पेस रेस सुरु झाली होती. आता कोरोना लशीवरुनही रशिया आणि चीनमध्ये स्पर्धा सुरु असल्याचं दिसतंय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT