Sachin Tendulkar WTC Final  esakal
देश

ICC World Cup: वर्ल्ड कप २०२३साठी सचिन तेंडुलकरवर मोठी जबाबदारी, ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड

भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकरची आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

Manoj Bhalerao

Sachin Tendulkar Global Ambassador: यंदाचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक भारतात आयोजित कऱण्यात आला आहे. हा विश्वचषक भारताने जिंकावा अशी प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. काही दिवसांपुर्वी आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीची भारताती काही शहरांमध्ये मिरवणुक देखील काढण्यात आली होती. भारतात आयोजित कऱण्यात आलेला हा विश्वचषक महत्वाचा असणार आहे. आयसीसी विश्वचषक २०२३साठी ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर म्हणून सचिन तेंडुलकरची निवड कऱण्यात आली आहे.

सचिन तेंडुकरला क्रिकेटचा देव म्हणूनही ओळखलं जातं. त्याने भारतासाठी अनेक चांगले डाव खेळून भारतासाठी विजयश्री खेचून आणली आहे. विश्वचषकामध्ये त्याने भारतासाठी ६ शतकं झळकावली तर पूर्ण कारकीर्दीत १०० आतंरराष्ट्रीय शतकं झळकवण्याचा विश्व विक्रम केला होता. जो आजही अबाधित आहे.

भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना ८ ऑक्टोबर या दिवशी खेळवला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Mega Bharti: ‘एमपीएससी’कडून २,६१९ पदांसाठी मेगाभरती; गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २७ जून ते १७ जुलै करा ऑनलाइन अर्ज..

IND vs IRE 1st T20I: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा 'डेब्यू' होणार? पहिल्या टी-२० साठी टीम इंडियाची अशी असेल Playing XI

Ketan Agarwal Murder Case : ... तर तिलाही त्याच किल्ल्यावरुन ढकलून द्या, सियाच्या वडिलांची धक्कादायक मागणी

‘टीईटी’ रविवारी! २० मिनिटे आधी केंद्रावर न पोहचलेल्या परीक्षार्थींना ‘टीईटी’साठी नो एंट्री; ‘या’ पाचपैकी एक ओरिजनल ओळखपत्र सोबत आणण्याचे बंधन, वाचा...

Protein-Rich Moong Makhana Chaat: रोजच्या बोरींग नाश्त्याला द्या ब्रेक! 10 मिनिटांत तयार करा हा प्रोटीनयुक्त मूग-मखाना चाट

SCROLL FOR NEXT