Sadhguru Jaggi Vasudev
Sadhguru Jaggi Vasudev 
देश

Sadguru Jaggi Vasudev Descharge: तातडीच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर सद्गुरूंना मिळाला डिस्चार्ज; कशी आहे प्रकृती?

सकाळ ऑनलाईन

नवी दिल्ली: आध्यात्मिक गुरु आणि ईशा फाऊंडेशनचे प्रमुख सद्गुरु जग्गी वासूदेव यांच्यावर काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात मेंदूवरील तातडीची शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज दहा दिवसांनी त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Sadhguru Jaggi Vasudev Discharge from apollo hospital after emergency brain surgery)

काही दिवसांपासून डोकेदुखीचा तीव्र त्रास होत असल्यानं १७ मार्च रोजी सद्गुरुंना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या ठिकाणी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज दहा दिवसांनंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनानं घेतला, त्यानुसार त्यांना रुग्णालयातून आज घरी पाठवण्यात आलं. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, अपोलो हॉस्पिटलच्या जॉइंट एमडी डॉ. संगिता रेड्डी यांनी सद्गुरुंच्या प्रकृतीत सुधारणा असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. बरं होत असतानाही सद्गुरूंमध्ये तोच उत्साह कायम होता. जागाच्या भल्यासाठी त्यांची बांधिलकी, त्यांचं कुशाग्र मन आणि त्यांची विनोदबुद्धी सर्व काही कायम आहे, सद्गुरुंच्या प्रकृतीची काळजी असणाऱ्या लाखो लोकांसाठी ही एक खूप चांगली बातमी आहे, असंही डॉ. रेड्डी यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

सद्गुरुंवर उपचार करणारे डॉ. विनित सुरी, प्रणव कुमार, सुधीर त्यागी, एस. चटर्जी आणि अपोलो हॉस्पिटल्सच्या संपूर्ण टीमचं ईशा फाऊंडेशनने आभार मानले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT