Nirupam on Shivsena: "खिचडी चोरासाठी प्रचार करणार नाही"; काँग्रेस नेत्याचा शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात आक्रमक पवित्रा

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आज आपली उमेदवारांची यादी जाहीर केली.
sanjay nirupam
sanjay nirupam

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आज आपली उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्यात नाव आलेल्या अमोल किर्तीकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी विरोध दर्शवला आहे. खिचडी चोरासाठी आम्ही काम करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. (sanjay nirupam calls uddhav thackeray candidate khichdi chor street fight over seats)

sanjay nirupam
PM Narendra Modi : ''ED ने जप्त केलेली संपत्ती गरीबांमध्ये वाटणार'', पंतप्रधान मोदींचा फोनकॉल?

पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम म्हणाले, "अमोल किर्तीकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम इथून दिलेली उमेदवारी ही आघाडी धर्माचं उल्लंघन आहे. शिवसेनेनं खिचडी चोराला तिकीट दिलं आहे. आम्ही या खिचडी चोरासाठी काम करणार नाही" (Latest Marathi News)

sanjay nirupam
Madha Lok Sabha 2024: माढ्यात भाजप उमेदवाराची कोंडी! भाजपच्या उमेदवाराला मोहिते-पाटील, रामराजे निंबाळकरांचा विरोध

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये सांगली आणि मुंबई दक्षिण-मध्यच्या जागेबाबत अद्याप तोडगा निघालेला नसतानाही शिवसेनेनं या ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. (Latest Maharashtra News)

यावरुन निरुपम हे आक्रमक झाले असून काँग्रेसच्या नेतृत्वाला यामध्ये हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्याचबरोबर मुंबईतील सहा जागांपैकी पाच जागा शिवसेना लढवणार असून काँग्रेससाठी केवळ एकच जागा सोडली आहे, हा प्रकार म्हणजे मुंबीत काँग्रेसला गाडून टाकण्याचा प्रकार असल्याचंही निरुपम यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

sanjay nirupam
हनिमूनला गेला अन् पत्नीला 'सेकंड हँड' म्हणाला! 3 कोटी भरण्याचे आदेश, वाचा काय आहे प्रकरण

शिवसेनेनं टोकाची भूमिका घेऊ नये, यामुळं काँग्रेसचं मोठं नुकसान होईल. काँग्रेस नेतृत्वानं यामध्ये हस्तक्षेप करावा, असं मला वाटतं नाहीतर पक्ष वाचवण्यासाठी युती तोडावी. शिवसेनेसोबत युतीचा निर्णय म्हणजे काँग्रेससाठी विनाश आहे”, असंही निरुपम यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

sanjay nirupam
Babar Azam : आफ्रिदीचे कर्णधारपद धोक्यात... बाबर आझमला पुन्हा मिळणार पाकिस्तान संघाचे नेतृत्व?

निरुपम यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, "निरुपम कोण आहेत? मला माहीत नाही. पण आमच्या पक्षात शिस्त आहे. एकदा उद्धव ठाकरेंनी उमेदवारांची नावं जाहीर केली की मग विषय संपला"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com