अब्दुल्ला आझम Sakal
देश

43 गुन्ह्यांचे आरोप तरी मिळवला जामीन; नेत्याचं कुटुंबच होतं गजाआड

समाजवादी पक्षाचा नेता आझम खान याचा मुलगा अब्दुल्ला आझम याची शनिवारी सायंकाळी सीतापूर तुरुंगातून सुटका करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

सीतापूर : समाजवादी पक्षाचा नेता आझम खान (Azam Khan) याचा मुलगा अब्दुल्ला आझम (Abdullah Azam) याची शनिवारी सायंकाळी सीतापूर तुरुंगातून सुटका करण्यात आली. अब्दुल्लाविरुद्ध ४३ गुन्हे दाखल आहेत. सर्व प्रकरणांत त्याने जामीन मिळविला. त्यामुळे त्याची सुटका करण्यात आली.

तो पित्यासह फेब्रुवारी २०२० पासून येथील तुरुंगात होता. त्याआधी ते रामपूर कारागृहात होते. सीतापूर तुरुंगाचे अधिक्षक सुरेश सिंह यांनी सांगितले की, रामपूर न्यायालयाच्या आदेशानुसार अब्दुल्लाची सुटका करण्यात आली. आधी आलेल्या आदेशात काही त्रुटी होत्या. त्यामुळे नव्या आदेशानंतर कार्यवाही करण्यात आली.

त्याच्या सुटकेच्यावेळी असंख्य समर्थक तुरुंगासमोर जमले होते. अब्दुल्ला कुटुंबीयांसह मोटारीतून रामपूरला रवाना झाला. त्याआधी त्याने उपस्थित पत्रकारांना सांगितले की, दहा मार्च रोजी राज्यातील जुलूमाचा अंत होईल आणि जुलमी शासक पदच्युत होतील.

कुटुंब झाले होते गजाआड

फसवणूकीसह अनेक गुन्ह्यांचा आरोप अब्दुल्लावर आहे, मात्र तो सपाच्या तिकिटावर रामपूरमधून निवडणूक लढविण्याची दाट शक्यता आहे. २०१७ मध्ये तो सपाकडून स्वार मतदारसंघातून विजयी झाला होता, मात्र डिसेंबर २०१९ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याची निवडणूक अवैध ठरविली होती.

उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्याचे वय २५ पेक्षा कमी असल्याचे सिद्ध झाले होते. बनावट जन्मदाखल्याप्रकरणी फेब्रुवारी २०२० मध्ये आझम, पत्नी तझीम फातिमा आणि अब्दुल्ला रामपूर न्यायालयाला शरण गेले. आमदार असलेल्या फातिमाने डिसेंबर २०२० मध्ये जामीन मिळविला. अनेक गुन्ह्यांचा आरोप असलेला आझम अजूनही तुरुंगात आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार आझमविरुद्ध ८१, तर फातिमाविरुद्ध ३२ गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Ferritin Test: ‘नॉर्मल’ हिमोग्लोबिनमुळे गाफील राहू नका! ‘फेरिटिन’ टेस्टही आहे तितकीच महत्त्वाची

Latest Marathi News Live Update: सोलापूर शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारिणी जाहीर

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

SCROLL FOR NEXT