Renaming Row: Supreme Court's Refusal to Intervene in Maharashtra Case  esakal
देश

Breaking ! छत्रपती संभाजीनगर अन् धाराशिवचे नाव राहणार कायम, सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय

latest news and updates on the Sambhajinagar and Dharashiv renaming case: महाराष्ट्रातील नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, अलाहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण सारखे नाहीत आणि नामांतराच्या बाबतीत कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

Sandip Kapde

औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाने संभाजीनगर (औरंगाबाद) आणि धाराशिव (उस्मानाबाद) नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती. नामांतरानंतर शहराचे किंवा रेल्वे स्टेशनचे नाव बदलल्यावर नेहमीच काही लोक समर्थनार्थ आणि काही विरोधात असणार आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

नामांतराच्या अधिकारावर कोर्टाचे निरीक्षण

सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. न्यायालयाने असेही निरीक्षण केले की, नामांतरामुळे काही लोक समर्थनार्थ असतील तर काही विरोधात. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.

याचिकर्त्यांचे वकील एस. बी. तळेकर यांचे मुद्दे

याचिकर्त्यांचे वकील एस. बी. तळेकर यांनी न्यायालयात मांडले की, जेव्हा नाव बदलले जाते तेव्हा पूर्वी सूचना आणि हरकती मागवण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जाते. परंतु औरंगाबाद प्रकरणी असे घडलेले नाही. त्यांनी १९९५ साली उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नाव बदलले गेले होते तेव्हा सुप्रीम कोर्टाने याचिकांवर सुनावणी घेतली होती, असेही नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय

महाराष्ट्रातील नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, अलाहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण सारखे नाहीत आणि नामांतराच्या बाबतीत कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे, न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे कोर्टाने म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT