देश

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणतात, यामुळे एन्काऊंटरला प्रोत्साहन मिळते; निर्णयाचा फेरविचार व्हावा

सिद्धार्थ लाटकर

सातारा : विकास दुबे एन्कांऊटरमुळे राजकीय नेते-पोलिस-माफीया यांच्यातील अभद्र युतीचा आता पर्दाफाश होऊ शकणार नाही. कैद्यांच्या हातात बेड्या न घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांमुळे पोलिस एन्काऊंटरला प्रोत्साहन मिळते. त्याचा फेरविचार होणे आवश्‍यक आहे, असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्टिट करुन म्हटले आहे.

एक राज्यमंत्र्यांची पोलिस ठाण्यातच गोळ्या झाडून हत्या करणारा आणि बिकरू गावात डीएसपीसह आठ पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य कुप्रसिद्ध डॉन विकास दुबे याचा दहा जूलैला कानपूर शिवेवर एन्काऊंटर झाला.

दुबेच्या एन्काऊंटरनंतर सोशल मिडियावर तऱ्हे तऱ्हेच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्याही उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त हाेताना दिसत आहे. गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटर संदर्भात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्टिट केले आहे.

श्री. चव्हाण म्हणतात, विकास दुबे एन्काऊंटरमुळे राजकिय नेते-पोलिस-माफीया यांच्यातील अभद्र युतीचा पर्दाफाश होऊ शकणार नाही. कैद्यांच्या हातात बेड्या न घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे पोलिस एन्काऊंटरला प्रोत्साहन मिळत आहे. त्याचा फेरविचार होणे आवश्‍यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

'या' जिल्ह्यात खासगी रुग्णालय, मोठ्या शाळा, महाविद्यालयांचा 'या' साठी शाेध सुरु 

सातारा जिल्ह्यातील 'हे' शहर पुढचे पाच दिवस राहणार बंद

दहिवडीतील तरुणांमुळे पोलिसांनी खटाव तालुक्यातील चोरट्यास पकडले
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT