Supreme Court
Supreme Court 
देश

बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार? SC ची विचारणा

कार्तिक पुजारी

सुप्रीम कोर्टाने CBSE आणि ICSE बोर्डाला 12 वीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन कशापद्धतीने करण्यात येईल, हे स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.

नवी दिल्ली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व महत्त्वाच्या परीक्षा रद्द केल्या जात आहेत. केंद्र सरकारने बुधवारी 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने CBSE आणि ICSE बोर्डाला 12 वीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन कशापद्धतीने करण्यात येईल, हे स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाने CBSE आणि ICSE बोर्डाला दोन आठवड्यांचा कालावधी दिला असून भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे या कालावधीत बोर्डाला विद्यार्थ्यांना गुण किंवा ग्रेड कशाच्या आधारावर दिले जाणार आहेत, हे सांगावं लागे. (SC asks CBSE ICSE to reveal objective criteria adopted for awarding marks grades class 12 students)

कोरोनाचा रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका कायम आहे. शिवाय देशात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून CBSE आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण, सुप्रीम कोर्टाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. देशभरात जवळपास 1 कोटी CBSE आणि ICSE विद्यार्थी बारावीमध्ये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मुल्यमापन कशापद्धतीने करण्यात येईल हे स्पष्ट करण्यास बोर्डाला सांगितलं आहे. त्यामुळे बोर्ड सुप्रीम कोर्टाला काय उत्तर देईल हे पाहावं लागेल.

student

CBSE 12 वी बोर्ड परीक्षा घ्यायच्या की नाही, यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली होती. या बैठकीत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला. गुणांचे मूल्यमापन कसे करणार? याबाबत सीबीएसईने अद्याप माहिती दिली नाही, पण त्याच्या निकषांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील परीक्षेचं काय?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीची परीक्षा रद्द (HSC Exam) करण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे. या परीक्षेच्या विरोधात कोणी कोर्टात जाऊ नये म्हणून त्यासंदर्भातील घोषणा करण्यापूर्वी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे यासाठीचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा प्रस्ताव आल्यानंतर राज्यात बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT