Omicron : ज्येष्ठ भारतीय शास्त्रत्र म्हणतात, 40 वर्षांवरील लोकांना द्या बूस्टर डोस esakal
देश

Omicron : शास्त्रज्ञ म्हणतात, 40 वर्षांवरील लोकांना द्या बूस्टर डोस

Omicron : ज्येष्ठ भारतीय शास्त्रत्र म्हणतात, 40 वर्षांवरील लोकांना द्या बूस्टर डोस

सकाळ वृत्तसेवा

भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी शिफारस केली आहे, की देशातील 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस द्यावा.

ओमिक्रॉन (Omicron) या कोरोना (Covid-19) विषाणूच्या नवीन व्हेरिएंटच्या धोक्‍याच्या पार्श्वभूमीवर, भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी (Scientist) शिफारस केली आहे, की देशातील 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस (Booster dose) द्यावा. टॉप भारतीय जीनोम शास्त्रज्ञांनी 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना प्राधान्य देऊन कोरोना लसीच्या बूस्टर डोसची शिफारस केली आहे. भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्‍स सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम (INSACOG) च्या साप्ताहिक बुलेटिनमध्ये ही शिफारस करण्यात आली आहे. वास्तविक, INSACOG हे कोरोनाच्या जीनोम व्हेरिएशन्सवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळांचे नेटवर्क आहे.

टॉप शास्त्रज्ञांची संस्था असलेल्या INSACOG च्या बुलेटिनमध्ये सांगण्यात आले, की ज्या लोकांना लसीकरण केले गेले नाही अशा लोकांना जास्त धोका असतो आणि त्यांनी आधी लसीकरण केले पाहिजे आणि 40 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याचा विचार केला पाहिजे. यामध्ये, उच्च जोखीम आणि उच्च धोका असलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाऊ शकते. देशातील साथीच्या परिस्थितीवर लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान खासदारांनी कोविड लसींच्या बूस्टर डोसच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही शिफारस करण्यात आली आहे.

INSACOG ने सांगितले, की आवश्‍यक सार्वजनिक आरोग्य उपाय सक्षम करण्यासाठी या प्रकारचे व्हेरिएंट लवकर शोधण्यासाठी जीनोमिक पाळत ठेवणे महत्त्वाचे आहे. शास्त्रज्ञांच्या या संघटनेने यात्रांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. असे म्हटले आहे की, ओमिक्रॉन (आफ्रिकन देश) प्रभावित क्षेत्रांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि कोरोना विषाणूच्या प्रकरणांचे कॉन्ट्रॅक्‍ट ट्रेसिंग देखील केले पाहिजे, जेणेकरून बाधित भागात त्याचा संसर्ग शोधला जाऊ शकेल. चाचण्यांची संख्या, प्रतिबंधात्मक उपाय लागू केले पाहिजे.

दरम्यान, पश्‍चिम पॅसिफिकमधील जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की काही देशांनी सीमा बंद करण्याच्या उपायांचा अवलंब केल्याने कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन स्वरूपाचा सामना करण्यासाठी वेळ मिळू शकतो, परंतु जागतिक महामारीशी लढण्याचा पाया डेल्टा स्वरूपाचा सामना करताना घेतलेले उपाय आणि त्यातून मिळालेले अनुभव यातून असला पाहिजे. फिलीपाईन्सच्या मनिला येथून शुक्रवारी प्रसारित झालेल्या ऑनलाइन वार्ताहर परिषदेत पत्रकारांशी बोलताना, WHO चे पश्‍चिम पॅसिफिक विभागाचे प्रादेशिक संचालक डॉ. ताकेशी कासाई म्हणाले की, कोविड-19 ची प्रकरणे काही देशांमध्ये वाढत असताना, इतर अनेक देशांमध्ये प्रकरणे कमी होत आहेत. मृत्यूची संख्याही कमी झाली आहे.

ते म्हणाले, की या सर्वांची चांगली बातमी अशी आहे, की आमच्याकडे आमच्या प्रतिसादाची दिशा बदलण्याची आवश्‍यकता आहे असे सूचित करणारी कोणतीही आवश्‍यकता ओमिक्रॉनबाबत नाही. नवीन व्हेरिएंटबद्दल बरेच काही अज्ञात आहे, ज्यामध्ये ते अधिक सांसर्गिक असू शकते, लोकांना अधिक गंभीरपणे आजारी बनवू शकते किंवा लसी त्यास प्रतिसाद देत नाहीत अशी शक्‍यताही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT