देश

आधी ‘जय श्री राम’ म्हण! मुस्लिम व्यक्तीवर सक्ती; दोघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

उज्जैन : एका मुस्लिम व्यक्तीला ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांना दोघांना अट केली आहे. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर त्याबाबत कारवाई करण्यात आली. दोघे जण मुस्लीम व्यक्तीचा हात पकडून ठेवून ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्याची बळजबरी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. सुरुवातीला या मुस्लीम व्यक्तीने अशा घोषणा देण्यास नकार दिला. तेव्हा अशा घोषणा देण्यात तुला काय अडचण आहे, अशी विचारणा त्या दोघांनी केल्याचेही दिसत आहे. वारंवार याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित मुस्लिम व्यक्तीने ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

“आमच्या गावात येऊन कमावतोस कसा? परवानगी घेऊन येतोस का? मग ‘जय श्री राम’ म्हणायला काय हरकत आहे? तुला ‘जय श्री राम’ म्हणावेच लागेल”, असे म्हणत त्या दोघांनी संबंधित मुस्लिम व्यक्तीचा हात पकडून ठेवला. त्यामुळे, अखेर त्या व्यक्तीने ‘जय श्री राम’ म्हणत “आता तुम्ही खूष आहात का?” अशी विचारणा केली. त्यावर, त्या दोघांनी “आता आम्ही खूष आहोत” असे म्हटल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

यासंदर्भात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी ट्विटरवरुन सरकारवर रोष व्यक्त केला आहे. किती दिवस सरकार मूक दर्शक बनून असले प्रकार बघत बसणार आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. आता या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत संबंधित दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या त्यांची चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT