Musewala Sakal
देश

मुसेवालाच्या हत्येचा संबंध तिहार तुरुंगाशी, लॉरेन्स बिश्नोईची SIT कडून चौकशी

सिद्धू मुसेवाला हत्येनंतर तपासासाठी SIT स्थापन करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर अधिकाऱ्यांनी दिल्लीच्या तिहार तुरुंगातील कैदी लॉरेन्स बिश्नोईच्या सेलमध्ये झडती घेतली आहे. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईची टोळी आणि कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार यांनी घेतली आहे. त्यानंतर ही झडती घेण्यात आली आहे. या दरम्यान, अधिकाऱ्यांना काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले.

दरम्यान, यानंतर पंजाब पोलीस तिहार जेलला भेट देणार असून, बिश्नोईला ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात असून, अद्यापर्यंत याबाबत कारागृह विभागाला पंजाबकडून कोणतीही सूचना मिळालेली नाही. परंतु, बिश्नोई ब्रारच्या संपर्कात कसा होता आणि तुरुंगातूनच हल्ल्याची योजना कशी आखली होती, याची चौकशी केली जाईल असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई

उत्तर भारतातील टॉप गँगस्टरपैकी एक असलेल्या बिश्नोईवर दिल्ली, राजस्थान आणि पंजाबमध्ये खून, दरोडा आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्याचा जवळचा सहकारी संपत नेहरा याला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. दिल्लीस्थित गुंड कला जाठेदी हा देखील बिश्नोईच्या निकटवर्तीयांपैकी एक आहे. गेल्या वर्षी अटक होईपर्यंत जठेदी हा दिल्लीतील मोस्ट वॉन्टेड व्यक्ती होता. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत 700 हून अधिक लोक असून त्यात एकापेक्षा जास्त शूटर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या लॉरेन्स बिश्नोई तिहार तुरुंगात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT