seema haider Sakal
देश

Seema Haider: आज हिंदू झाली, उद्या ख्रिश्चन होईल, ती तसलीच आहे...; सीमाच्या मैत्रिणीचा व्हिडीओ व्हायरल

या तरुणीचं म्हणणं आहे की, ती सीमाला लहानपणापासून ओळखते.

वैष्णवी कारंजकर

आपल्या चार मुलांसह सीमा ओलांडत पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची लव्हस्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहेत. सध्या ती आपला प्रियकर सचिन याच्यासोबत ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा भागात राहत आहे. सचिनच्या घराबाहेर लोकांची रांग लागलेली असते. लोकांना सीमाशी बोलायचं असतं, तिला पाहायचं असतं. या सगळ्यातच सीमाची लहानपणीच्या मैत्रिणीचा, एका पाकिस्तानी युवतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या तरुणीचं म्हणणं आहे की, ती सीमाला लहानपणापासून ओळखते. तिच्यावर टीका करताना ही तरुणी म्हणते की ती सीमाला चांगलंच ओळखते. सीमा धोकेबाज आहे, ती हिंदू आणि पाकिस्तानातल्या लोकांना धोका देत आहे, असंही ही युवती या व्हिडीओमध्ये म्हणते. एवढंच नव्हे तर सीमा इस्लाम सोडून हिंदू बनली आहे,पुढे जाऊन ती ख्रिश्चनही बनू शकते, असंही या तरुणीने म्हटलं आहे.

ही तरुणी म्हणते, “सीमा धोका देणारी आहे. तिचे अनेक पुरुष मित्र आहेत. ती प्रत्येकासोबत असंच करते. सीमा सध्या नाटक करत आहे. तिला कुठेच शांतता मिळणार नाही. तिने भारतात जाऊन क्रिकेट मॅच बघणार असल्याचं सांगितलं होतं, पण आता तिथे जाऊन तिने नाटकं सुरू केली आहेत. ”

सचिन तिच्यापासून सावध राहा!

या तरुणीने सचिनला सल्लाही दिला आहे. ही तरुणी म्हणते, सचिन तू सीमापासून सावध राहा. ती खूप धोकेबाज आणि फ्रॉड आहे. तिने अनेक लोकांना धोका दिला आहे. तुझ्या परिवारालाही ती धोका देईल. या आधी आणखी एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये एक युवक स्वतःला सीमाचा पूर्व प्रियकर म्हणवत होता. त्यानेही दावा केला होता की सीमाने सचिनच्या आधी त्याच्याशी PUBGच्या माध्यमातून संपर्क केला होता. दोघांच्या गप्पाही व्हायच्या. सीमा सर्वकाही सोडून त्याच्याकडे येण्यास तयार होती. सीमाला क्रिकेट पाहण्याची आवड आहे. तिला वर्ल्डकप २०२३ ची मॅच पाहायची होती. म्हणूनच ती भारतात आली होती.

’१० मार्चला आम्ही पहिल्यांदा भेटलो’

व्हिडीओतली पाकिस्तानी तरुणी पुढे म्हणते की वर्डकप पाहिल्यावर सीमा पुन्हा पाकिस्तानात परत येईल. तर इकडे भारतात आलेली सीमा आता स्वतःच्या नावापुढे प्रियकर सचिनचं नाव जोडू लागली आहे. या आधी सीमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती सांगते की, आम्ही पहिल्यांदा १० मार्च रोजी भेटलो होतो. तेव्हा रात्री ९ किंवा १० वाजले होते. आम्ही १३ मार्च रोजी लग्न केलं. कोणीतरी आम्हाला मंदिराबद्दल सांगितलं होतं. खूप छान मंदिर आहे, खूप मोठं आहे. ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहायला होतो, तिथून फक्त २० मिनिटांच्या अंतरावर मंदिर होतं. तिथे आम्ही लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bandh: देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन! आज महाराष्ट्र बंद, कोणत्या सुविधा चालू तर कोणत्या बंद? जाणून घ्या...

RadhaKrishna Irrigation Project : कृष्णा नदीच्या पाण्यावरून वाद पेटला! कोल्हापुरातील प्रस्तावित धरणाला कर्नाटकचा तीव्र विरोध; कन्नड संघटनांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

Instagram New Feature : इंस्टाग्रामवर पोस्ट डिलीट न करता बदला गाणं; Replace Audio फीचर लॉन्च, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

IND vs ZIM Pitch Report: हरारेची खेळपट्टी आज नेमकी कशी खेळणार? फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? सामना FREE कुठे पाहणार?

SCROLL FOR NEXT