Crime News esakal
देश

Crime News: ओयो हॉटेलमध्ये भरले 'सेक्स मार्केट', 1000-2000 रुपयांत होते मुलींची खरेदी-विक्री ; ग्राहकांमध्ये हाय प्रोफाईल नावे

Crime News: हॉटेलमधून 16 ते 17 वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. बिहारमधून नोकरीचे आमिष दाखवून नोएडा येथे आणल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले.

Sandip Kapde

Crime News: वेश्याव्यवसाय करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तीन जण सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी ४ अल्पवयीन मुलींसह सात महिलांची सुटका केली आहे. नोएडा सेक्टर -६३ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बहलोलपूर गावातील ओयो हॉटेलमध्ये हे प्रकरण सुरु होते. आरोपी बिहारमधून मुलींना बहाण्याने आणायचे आणि त्यांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडायचे.

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि मानव तस्करी विरोधी पथकाला बुधवारी माहिती मिळाली होती की बहलोलपूर गावात असलेल्या ओयो हॉटेल शीतलमध्ये वेश्याव्यवसाय होत आहे. हे हॉटेल फरमान आणि त्याचा भाऊ फैयाज चालवत होते. हे लोक बिहारमधून अल्पवयीन मुलींना नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने दिल्ली-एनसीआरमध्ये आणायचे आणि त्यांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडायचे.

यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. तेथून पोलिसांनी अझरुद्दीन उर्फ ​​अज्जू, अख्तर मोहम्मद, सुमित कुमार, धर्मेंद्र कुमार, मोहम्मद फैयाज, फरमान आणि मरगूम आलम यांना अटक केली. हॉटेलच्या इमारतीचा मालक सुरेंद्र यादव, रुखसाना आणि हॉटेलचालकांना मुली पुरवणारे रेहमान उर्फ ​​बल्लू भाई फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हॉटेलमधून 16 ते 17 वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. बिहारमधून नोकरीचे आमिष दाखवून नोएडा येथे आणल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले. आरोपींच्या चौकशीत ते ग्राहकांकडून एक ते दोन हजार रुपये घेत असल्याचे उघड झाले. किशोरवयीन मुली व महिलांनी विरोध केल्यास त्यांना धमकावण्यात आले. पोलिसांनी हॉटेलमधून एक डायरीही जप्त केली, ज्यामध्ये त्यांच्या ग्राहकांची यादी होती. हिंन्दुस्तान लाईव्हने याबाबत वृत्त दिले. (Crime News)

पोलिसांनी घटनास्थळावरून 11 मोबाईल फोन, 12,110 रुपये आणि आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत. आरोपींच्या मोबाईलच्या आधारे या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे, याचाही शोध पोलीस घेत आहेत. तपासादरम्यान पोलिसांना अनेक प्रसिद्ध लोकांचीही माहिती मिळाली, जे येथे येत असत. आरोपींना गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले, अशी माहिती पोलीस स्टेशन प्रभारींनी दिली. तेथून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात महिन्यातील दूसरा सर्वात मोठा बदल! 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Pune Baner Dowry Harassment Case : 3 महिन्यांपूर्वी लग्न, बाणेरमध्ये विवाहितेनं संपवलं आयुष्य; पतीचं अमेरिकेत शिक्षण, 21 तोळे सोन्यासाठी छळ

Latest Marathi News Live Update : Mumbai Pune Expressway वर अवजड वाहनांना दोन दिवस बंदी

Nagpur Rare Earth Discovery : विदर्भाचं भाग्य उजळणार! 'वेकोलि'च्या खाणीत सापडला मौल्यवान खनिजांचा साठा; पाहा कोणत्या 6 खाणी आहेत या यादीत

विज्ञानक्षेत्र अडकतेय कर्मकांडात!

SCROLL FOR NEXT