Shahrukh Khan sakal
देश

Shahrukh Khan : शाहरुखची १२ वर्षांनंतर काश्‍मीरला भेट

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शुक्रवारी पुलवामाला भेट दिली.

जावेद मात्झी

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शुक्रवारी पुलवामाला भेट दिली.

श्रीनगर - बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शुक्रवारी पुलवामाला भेट दिली. आगामी ‘डंकी’ चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी शाहरुख काश्‍मीरमध्ये आला होता.

‘जब तक है जान’ या चित्रपटासाठी १२ वर्षांपूर्वी त्याने काश्‍मीरला भेट दिली होती. काश्‍मीरमध्ये आल्यानंतर तो थेट सोनमर्गला गेला. तेथील ताजवास भागात मंगळवारी गाण्याचे चित्रीकरण केले. दोन दिवसांनंतर पुढील चित्रीकरणासाठी त्याने श्रीनगर आणि पुलवामाला भेट दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान संगम-डोगरीपुरा-पंझगाम रस्त्याने पंझगाम रेल्वे स्थानकावर पोहोचला. तेथे गाण्यावरचे उर्वरित चित्रीकरण पूर्ण केले.

शाहरुख खानच्या काश्‍मीर मुक्कामाची आणि चित्रीकरणाची माहिती सुरक्षेच्या कारणावरून उघड केली नव्हती. जेथे चित्रीकरण सुरू होते, तो भाग नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला होता, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

काश्‍मीरमध्ये चित्रीकरण पुन्हा सुरू झाल्यास रोजगार निर्मितीला हातभार लागेल आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

- मनोज सिन्हा, नायब राज्यपाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT