Shashank_manohar
Shashank_manohar 
देश

शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आज (बुधवार) वैयक्तिक कारणामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 

शशांक मनोहर 2016 मध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले होते. मे 2016 मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शशांक मनोहर यांची आयसीसीचे पहिले स्वतंत्र अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. 2016 मध्ये आयसीसीने बदललेल्या नियमानुसार कोणत्याही देशाच्या क्रिकेट नियामक मंडळाशी संबंधीत नसलेली व्यक्तीच आयसीसीचे अध्यक्ष बनू शकत होती. त्यामुळे शशांक मनोहर यांनी त्यावेळी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की मी माझ्यावतीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. सर्व सदस्यांना एकत्र घेऊन काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT