Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

Irfan Pathan Criticize Hardik Pandya Captaincy MI vs KKR IPL 2024
Irfan Pathan Criticize Hardik Pandya Captaincy MI vs KKR IPL 2024 esakal

Irfan Pathan Criticize Hardik Pandya Captaincy MI vs KKR IPL 2024 : मुंबई इंडियन्सने केकेआरविरूद्धचा सामना गमावल्यानंतर त्यांच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. केकेआरने तब्बल 12 वर्षांनी मुंबईला वानखेडेवर मात दिली. सामना सुरू झाला त्यावेळी सामन्यावर मुंबईची पकड होती. त्यांनी केकेआरची अवस्था 5 बाद 57 धावा अशी केली होती. मात्र तिथून पुढे केकेआरने 170 धावा उभारल्या.

दरम्यान, मुंबईच्या पराभवानंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने मुंबईच्या यंदाच्या हंगामातील खराब कामगिरीला हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीला जबाबदार धरलं. त्यानं केकेआरच्या सामन्यात पांड्यानं केलेली चूक लक्षात आणून दिली तसेच मुंबईचा संघ कसा एकसंध नाही हे सांगितलं.

इराफन पठाणच्या मते व्यंकटेश अय्यर आणि मनिष पांडे यांच्यात भागीदारी होऊ देणं हीच मोठी चूक असल्याचं सांगितलं.

Irfan Pathan Criticize Hardik Pandya Captaincy MI vs KKR IPL 2024
MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

इरफान पठाण व्हिडिओ म्हणतो की, 'मुंबई इंडियन्सची स्टोरी आता संपली आहे. हा संघ कागदावर खूप चांगला होता. मात्र या संघाला व्यवस्थित मॅनेज केलं गेलं नाही. हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर उपस्थित केलेले प्रश्न हे योग्यच आहेत. ज्यावेळी तुम्ही केकेआरची अवस्था 5 बाद 57 धावा अशी केली होती. त्यावेळी तुम्ही नमन धिरला सलग तीन षटके गोलंदाजी देणे गरजेचे नव्हते.

तिथे केकेआरला भागीदारी करण्याची संधी मिळाली. मनिष पांडे आणि व्यंकटेश अय्यरने दमदार भागीदारी रचली. इथं जर तुमचा मुख्य गोलंदाज असता तर बराच फरक पडला असता. जो संघ 150 धावांपर्यंत गुंडाळला जाणे अपेक्षित होतं तिथे तुम्ही त्यांना 170 धावा करून दिल्या अन् त्याच अतिरिक्त धावा महागात पडल्या.'

Irfan Pathan Criticize Hardik Pandya Captaincy MI vs KKR IPL 2024
MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

हार्दिक पुढे म्हणाला की, 'कॅप्टन्सीचा खेळावर मोठा प्रभाव असते. मुंबई इंडियन्स एकसंध वाटली नाही. संघ व्यवस्थापनाला यावर लक्ष द्यावं लागेल. खेळाडूंनी त्यांच्या कॅप्टनचा आदर केला पाहिजे. आपल्याला हे मैदानावर दिसून आलं नाही. त्यांनी या गोष्टी सुधारायला हव्यात.'

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com