Uddhav Thackeray
Uddhav Thackeray 
देश

'कानून बनाओ, मंदिर बनाओ'; शिवसेना राममंदिरासाठी पुन्हा आग्रही

सकाळ न्यूज नेटवर्क

अयोध्या : अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. या ठिकाणी भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धैर्य असून, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मांडले. 'कानून बनाओ, मंदिर बनाओ'चा नारा देत उद्धव यांनी पुन्हा एकदा कडवट हिंदुत्वाचा राग आळवला आहे. 

उद्धव यांनी आज अठरा नवनिर्वाचित खासदारांसमवेत अयोध्येला भेट देत रामलल्ला मंदिरामध्ये पूजाअर्चना केली. या वेळी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला भेट देत राममंदिराच्या उभारणीचा मुद्दा उपस्थित केला होता. आता निवडणूक संपल्यानंतर आमच्या पक्षप्रमुखांनी हे वचन पाळले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

येथे पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव म्हणाले की, "मागील अनेक वर्षांपासून हा खटला न्यायालयामध्ये आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धैर्य असून सरकारने आता जरी राम मंदिराच्या उभारणीचा निर्णय घेतला तरीसुद्धा त्यांना कोणीही रोखू शकत नाही. केवळ शिवसेनाच नाही तर जगातील हिंदू हे मोदींसोबत आहेत.'' 

उद्धव म्हणाले 
- राममंदिरासाठी सरकारने अध्यादेश आणावा 
- मंदिर तातडीने उभारले जावे ही हिंदूंची इच्छा 
- राममंदिर हा राजकारणाचा नाहीतर श्रद्धेचा विषय 
- हिंदुत्वाच्या बळकटीलाच शिवसेना, भाजपचे प्राधान्य 
- मोदींना सत्ता मिळाली, त्यांनी जनतेचा आदर ठेवावा 
- चांगल्या कामासाठी विचारही चांगले हवेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT