देश

'भाजपला बहुमत मिळू नये ही तर गडकरींची इच्छा'

वृत्तसंस्था

मुंबई: भाजपला बहुमत मिळू नये ही तर गडकरींची इच्छा असल्याचे मत आज (ता.07) शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याच क्षणाची वाट पाहत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

देशातील सध्याची परिस्थिती भाजपासाठी अनुकूल नाही. तीन राज्यांमधील जनतेनं भाजपाविरोधात कौल दिला आहे, असं राऊत यांनी म्हटले आहे. सामना या दैनिकात लिहलेल्या लेखात राऊत यांनी असे म्हटले आहे. भाजपाला बहुमत न मिळाल्यास गडकरींनी पंतप्रधानाची संधी असेल आणि सध्या गडकरी त्यांच्या विधानातून त्याचेच संकेत देत आहेत, असेही त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार राऊत यांनी लेखातून पंतप्रधान मोदींवरही तोंडसुख घेतलं आहे. मोदींना 2014 मध्ये स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र त्यांना ही संधी पूर्णपणे गमावली. 2014 मध्ये मोदींच्या समर्थनाची लाट होती. कारण काँग्रेसचा पराभव करण्याचा निश्चय लोकांनी केला होता. मात्र आता देशातील परिस्थिती बदलली आहे. मोदींची प्रतिमा आता पूर्वीसारखी राहिलेली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT