Shobha Karandlaje esakal
देश

Karnataka : दारुण पराभवानंतर आता भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; 'या' नावाची जोरदार चर्चा

भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : प्रदेश भाजपच्या (BJP) अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे (Shobha Karandlaje), तर विरोधी पक्षनेतेपदी भाजपचे ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित असल्याचे समजते.

प्रदेश भाजपचे नूतन अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते निवडीबाबत पक्षाचे केंद्रीय निरीक्षक मनसुक मांडविया आणि विनोद तावडे यांनी भाजपच्या सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केला.

त्या आधारे केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांची भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. तसेच ज्येष्ठ आमदार बसनागौडा पाटील-यत्नाळ यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचा निर्णय झाल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत असून, मोदींनीही सहमती दर्शवल्याचे सांगण्यात येते. दोन्ही नावांची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे.

शोभा करंदलाजे यांनी यापूर्वी आमदार, विधान परिषद सदस्य, राज्यात मंत्री, तसेच पक्षाचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले. खासदार झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या शोभा करंदलाजे यांनी कृषी विभागात चांगले काम केले असून, पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रभारी म्हणूनही त्यांनी प्रभावीपणे काम केले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी या दोघांच्याही निवडीला सहमती दर्शवल्याचे मत बसनागौडा पाटील-यत्नाळ यांनी व्यक्त केले आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पंतप्रधान मोदींशी चर्चा करून दोन्ही निवडी जाहीर करतील.

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने निर्णय

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना पक्षाचे नेतृत्व अधिक आक्रमकपणे करण्यासाठी शोभा करंदलाजे आणि बसनागौडा पाटील यत्नाळ यांची नियुक्ती योग्य आहे, यावरून ज्येष्ठ मंडळी या निष्कर्षाप्रत आल्याचे बोलले जात आहे. पक्ष निरीक्षकांनी राज्यात आमदारांची मते आजमावली.

आमदारांनी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आक्रमक नेत्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे बसवनगौडा पाटील-यत्नाळ यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले, तसेच शोभा करंदलाजे यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्यास ते अनुकूल असल्याचेही बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT