bihar boy beaten by teacher google
देश

चिमुरड्याच्या पाठीवर लाकूड तुटलं तरी शिक्षकाचा राग शांत झाला नाही, तो मारतंच राहिला!

सकाळ डिजिटल टीम

शिक्षक निरागस मुलाला आधी काठीनं मारहाण करतो, त्यानंतर लाकूड तुटलं तरी शिक्षकाचा राग शांत होत नाहीय.

बिहार : बिहारची राजधानी पाटणा (Bihar Patna) येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका कोचिंग शिक्षकानं पाच वर्षांच्या मुलाला एवढी मारहाण केली की, तो बेशुद्ध झाला. मुलाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणाचा एक व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिक्षक एका निष्पाप मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

पाच वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण

कोचिंग क्लासमध्ये एका विद्यार्थ्याला (Student) शिक्षकानं अमानुष मारहाण केलीय. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, गावातल्या लोकांनी कोचिंग क्लासमधील शिक्षकालाच नंतर बदडून काढलंय. कोचिंग क्लासमध्ये एका वर्गात हा शिक्षक इतर मुलांच्या देखत एका पाच वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झालाय. शिक्षकाचे (Teacher) फटके खात असताना हा विद्यार्थी कळवळत होता. त्याचं किंचाळणं काळीज पिळवटून टाकणारं होतं.

विद्यार्थ्याच्या पाठीत शिक्षकानं बुक्के घातले

लाकडाच्या फळीनं एकामागोमाग एक फटके या शिक्षकानं विद्यार्थ्याच्या पार्श्वभागावर लगावले. शिक्षकाच्या जोरदार प्रहारानं विद्यार्थी कळवळू लागला, तो रडू लागला. पण, शिक्षकानं मारहाण करणं थांबवलंच नाही. इतकाच नाही, तर नंतर काठी ठेवून हातानं मुलाच्या कानशिलातही शिक्षकानं लगावलीय. यानंतरही शिक्षक थांबला नाही. विद्यार्थ्याच्या पाठीतही शिक्षकानं बुक्के घातले. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय.

बेशुद्ध पडल्यानंतर मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण राजधानी पाटणा येथील जया कोचिंग क्लासचं (Jaya Coaching class) आहे. कोचिंग सेंटरमध्ये एका शिक्षकानं मुलाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शिक्षक निरागस मुलाला आधी काठीनं मारहाण करत आहे. लाकूड तुटले तरी शिक्षकांचा राग शांत होत नाहीय. यानंतर, शिक्षक या मुलाच्या तोंडावर मारतो आणि केस ओढतो. यादरम्यान, वेदनेनं रडत असताना मूल जमिनीवर पडतं आणि ते बेशुद्ध होतं. कोचिंगमध्ये बेशुद्ध पडल्यानंतर मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या या मुलावर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी, ज्या शिक्षकानं मुलाला एवढ्या निर्दयीपणे मारहाण केली, त्याचं नाव छोटू असं आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरूय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

Vasai Virar drainage cleanup: वसई-विरारमध्ये ५ जूनपर्यंत २०० हून अधिक नाल्यांची सफाई; फ्लड गेट्स, होल्डिंग पाँड्स अद्याप रखडले

SCROLL FOR NEXT