Shraddha Murder Case esakal
देश

Shraddha Murder Case: आफताब तिला मांस खायची सक्ती करायचा; खाल्लं नाही तर मारायचा; शेजाऱ्यांचा दावा

"जेव्हा आफताबने श्रद्धाला मारलं, तेव्हा त्याचे पालक त्यांच्या घरी आले आणि त्यांच्याशी बोलले."

सकाळ डिजिटल टीम

श्रद्धा वालकरच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ सध्या उकललं जात आहे. दिवसेंदिवस या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. आता श्रद्धाच्या शेजाऱ्यांनीही एक दावा केला आहे. आफताब श्रद्धाला मांस खाण्याची सक्ती करायचा, असं त्यांनी सांगितलं आहे.

श्रद्धाची शेजारी पूनम बिदलान यांनी हा खुलासा केला आहे. पूनम म्हणाल्या, "जेव्हा श्रद्धा माझ्याकडे आली, तेव्हा ती खूप घाबरलेली होती. तिला कोणीतरी खूप मारलं होतं. त्यावेळी मी तिला विचारलं की काय झालं. तिच्या चेहऱ्यावर मारल्याच्या खुणा होत्या. त्या दिवशी ते नॉनव्हेज खाण्यावरुन भांडले होते. तिने मला सांगितलं की ती लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती आणि तिचा बॉयफ्रेंड तिला खूप मारायचा.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, पूनम यांनी सांगितलं, "ती सांगत होती की, जेव्हा तिचा बॉयफ्रेंड चिडायचा आणि तिला मारायचा. त्यानंतर तो तिला एकटीला सोडून निघून जायचा. त्यानंतर तो थेट दुसऱ्या दिवशी परत यायचा." तू आफताबसोबत राहू नकोस,माझ्यासोबत राहायला ये, असंही पूनम यांनी सांगितलं. तसंच पोलीसांत तक्रार कर असं म्हणतही पूनम श्रद्धाच्या मागे लागल्या होत्या.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

पूनम यांनी पुढे सांगितलं, "जेव्हा आफताबने श्रद्धाला मारलं, तेव्हा त्याचे पालक त्यांच्या घरी आले आणि त्यांच्याशी बोलले." आता या प्रकरणातलं गूढ आज उलगडण्याची शक्यता आहे. आज आफताबची नार्को टेस्ट होणार आहे. त्यानंतर या प्रकरणात आणखी खुलासे होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT