Siddaramaiah vs Maharashtra Government esakal
देश

महाराष्ट्र सरकारचा कर्नाटकात हस्तक्षेप खपवून घेणार नाही; 'या' योजना लागू केल्याने सिद्धरामय्या संतापले

महाराष्ट्राने कर्नाटकात (Karnataka) कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील ८६५ गावांमध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) लागू केली आहे.

बेळगाव : महाराष्ट्राने कर्नाटकात (Karnataka) कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये. आमच्या राज्याच्या मुख्य सचिवांनी त्याबाबत अधिक महाराष्ट्र सरकारला कळविले. त्यामुळे महाराष्ट्राने कर्नाटकात आपल्या कोणत्याही योजना आणू नयेत, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी दिला आहे.

कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील ८६५ गावांमध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) लागू केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलमंगल येथे संगोळी रायण्णा सैनिक शाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते आले असता पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रातील या दोन वैद्यकीय योजनांबाबत छेडले असता महाराष्ट्र सरकारच्या हालचालीवर कर्नाटक सरकार लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्राने कर्नाटकात हस्तक्षेप करू नये, असे सांगितले.

राज्यात कन्नडचा सर्वत्र वापर केला जात असून, कन्नड शिक्षण घेणाऱ्यांना राखीवता देखील दिली जात आहे. संगोळी रायण्णा सैनिक शाळेत देखील कन्नड विद्यार्थ्यांसाठी ६५ टक्के आणि इतरांसाठी ३५ टक्के जागा राखीव ठेवण्याची कार्यवाही केली आहे. तेथे दर्जेदार शिक्षण घेऊन मुलांमध्ये देशभक्ती रुजवली जाईल. येथे शिकणाऱ्यांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळते. त्यासाठीच कन्नड विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे, असेही सिद्धरामय्या यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राने सीमावर्तीय ८६५ गावांमध्ये सुरू केलेल्या योजनामुळे कर्नाटकाची पोटदुखी वाढली आहे. त्यामुळे यापूर्वीच या योजना महाराष्ट्राने कर्नाटकात लागू करू नये, यासाठी कर्नाटकचे प्रयत्न सुरू झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या रुग्णालयांमध्ये योजना सुरू केली जाणार होती, त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देखील महाराष्ट्राने या योजना कर्नाटकात लागू करू नयेत, असे बजावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT