Navjot Singh Siddhu 
देश

गुरजीत सिंगमुळे सिद्धूचा राजीनामा? पाच महत्त्वाच्या घडामोडी

पंजाबच्या राजकारणात मोठी उलथा-पालथ झाली आहे.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: पंजाबच्या राजकारणात (politics) पुन्हा एकदा मोठी उलथा-पालथ झाली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला (Punjab congress) मोठा धक्का बसला आहे. नवज्योत सिंग सिद्धू (navjot singh sidhu) यांनी तडकाफडकी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain amrinder singh) दिल्लीत आहेत. जाणून घ्या पंजाबच्या राजकारणातील पाच महत्त्वाच्या घडामोडी

1 पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्ली दौऱ्यात ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील अशी चर्चा आहे. अमरिंदर सिंग यांचे मीडिया सल्लागार रावीन ठुकराल यांनी हे निव्वळ शक्यता आणि तर्क-वितर्क असल्याचे स्पष्ट केले. दिल्ली दौऱ्याचा जास्तच अर्थ काढला जातोय, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. अमरिंदर सिंग भाजपा नेत्यांची भेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे भाजपामधील सूत्रांनी सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

2 नवज्योत सिंग सिद्धू (navjot singh sidhu) यांनी तडकाफडकी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नियुक्तीनंतर दोन महिन्यातच पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबचे मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने सिद्धू नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. मी पंजाबच्या भविष्य आणि कल्याणाबाबत तडजोड करु शकत नाही, असे सिद्धूंनी राजीनामापत्रात लिहिले आहे.

3 पंजाबच्या मंत्रिमंडळात राणा गुरजीत सिंग यांना संधी दिल्याने सिद्धू नाराज होते, असे बोलले जात आहे. कापुरथालामधील आमदार गुरजीत सिंग यांच्या मंत्रिमंडळ समावेशावरुन काही वाद आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांनी हायकमांडला पत्र लिहून त्यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याची मागणी केली होती. अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात राणा गुरजीत सिंग मंत्री होते. पण १० महिन्यात २०१८ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. वाळू लिलावाच्या वादामध्ये त्यांचे नाव आले होते.

4 पंजाबचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी आजच मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर केले. त्याचवेळी हा वाद झाला. अमरिंदर यांची पुढची चाल आणि सिद्धूचा राजीनाम्याचा निर्णय पुढच्यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला कमकुवत करु शकतो.

5 दिल्लीला निघण्याआधी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर निशाणा साधला आहे. "मी तुम्हाला म्हणालो होतो...तो स्थिर माणूस नाहीय. पंजाब सारख्या सीमावर्ती राज्यासाठी ह योग्य माणसू नाही" असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी टि्वट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

SCROLL FOR NEXT